शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

हरलो म्हणून खचून जायचं नाही, हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिले : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 16:51 IST

अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने मालिका जिंकली. या मालिकेत भारतीय संघानं केलेल्या कामगिरीचं सगळीकडे कौतुक होत आहे.

पिंपरी: अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने मालिका जिंकली. या मालिकेत भारतीय संघानं केलेल्या कामगिरीचं सगळीकडे कौतुक होत आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ऑस्ट्रेलियन संघाविरूद्ध अत्यंत वाईट हरलो होतो. पण, हरलो म्हणून खचून जायचं नाही, हे मराठमोळ्या महाराष्ट्राचा सुपुत्र क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने दाखवून दिले आहे. भारतीय संघात बदल करून नवीन खेळाडूंना संघात स्थान दिले. त्यांनी जिद्द दाखवली आणि ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केले. हरलो म्हणून खचून जायचं नाही, हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने दाखवून दिले असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये माजी विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राजू मिसाळ, नाना काटे आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, देशात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असून, त्याला आगळं-वेगळं महत्व प्राप्त करून देण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे. त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध पण, त्यांनी कबड्डी, खो-खो, कुस्ती, क्रिकेट या खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम केले. अडचणी सोडविल्या, खेळाडूंना चांगलं मानधन कसे मिळेल, सर्वसामान्य कुटुंबातील गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू खेळाडू यांना संधी कशी मिळेल हे सर्व त्यांनी पाहिले,”................अजित पवार म्हणाले, “क्रिकेट हा खेळ सर्वांना आपलासा वाटतो. मध्यंतरी ऑस्ट्रेलियाविरोधात आपण अत्यंत वाईट हरलो. त्याच प्रत्येक भारतीयाला दुःख झालं. परंतु, हरलो म्हणून खचून जायचं नाही. भारतीय संघात बदल झाले. नवीन खेळाडू घेतले. त्यांनी जिद्द दाखविली. आयपीएलमधून देखील नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आहे. काही जणांनी क्रिकेटला स्वतःचं करिअर केलं. त्यात, धोनी, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवि शास्त्री यांची उदाहरणे समोर आहेत. पुढे देखील आणखी दर्जेदार खेळाडू निर्माण होतील. महाराष्ट्रात, पिंपरी-चिंचवड शहरात खेळाडू घडावेत. त्यांनी महाराष्ट्राच, देशाचं प्रतिनिधित्व करावे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीAjit Pawarअजित पवारAjinkya Rahaneअजिंक्य रहाणेIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलिया