शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमोल कोल्हेंच्या उमेदवारीबद्दल अजित पवारांनी पाळले मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 01:52 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात असताना ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांनी या संदर्भात सोईस्कर मौन पाळले.

नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात असताना ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांनी या संदर्भात सोईस्कर मौन पाळले. शिवसेनेतून ‘राष्ट्रवादी’त आलेल्या डॉ. कोल्हे यांचा त्यांचे जन्मगाव नारायणगाव येथे मंगळवारी (दि. ५) सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अजित पवार, आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.या वेळी अजित पवार डॉ. कोल्हे यांची उमेदवारी जाहीर करतील, अशी गावकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र पवारांनी डॉ. कोल्हेंच्या उमेदवारीबद्दलचा संभ्रम कायम ठेवला. ‘‘जुन्नरकरांच्या मनातील उमेदवार देण्यात येईल,’’ असे सांगून पवारांनी डॉ. कोल्हेंच्या उमेदवारीला बगल दिली. ‘स्टार प्रचारक’ म्हणून कोल्हेंवर राज्याची जबाबदारी टाकली जाणार असल्याचे पवारांनी सांगितले. पवारांच्या वक्तव्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी होती. डॉ. कोल्हेंना उमेदवारी जाहीर होईल, या अपेक्षेने गावकऱ्यांनी सत्कार कार्यक्रमाला गर्दी केली होती. मात्र या संदर्भात स्पष्टता न आल्याने गावकरी सभेनंतर नाराजी व्यक्त करून निघून गेले.>टीका : पुरंदरला विमानतळ नेण्याचे काम कोणाचे?‘‘पुरंदरला विमानतळ नेण्याचे काम कोणाचे आहे, बाह्यवळणाची कामे का बंद पडली आहेत,’’ असा सवाल पवारांनी केला. खेड ते सिन्नर रस्त्याचे १३८ किमी पैकी १०९ किमीचे काम झाले. २९ किमीचे काम अपूर्ण राहिले यास जबाबदार कोण, असेही पवारांनी विचारले. डॉ. कोल्हे यांनीही आढळराव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की शिवनेरीचा शिलेदार म्हणून १५ वर्षे काम करणारे प्रतिनिधी व मंत्री यांना या परिसराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देता आला नाही.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार