हवाईदल-इस्रोची संयुक्त अंतराळ मोहीम, अंतराळात मानव पाठविण्यासाठी तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 10:49 IST2019-02-08T05:16:31+5:302019-02-08T10:49:06+5:30

अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी गुरुवारी दिली.

Air force - ISRO joint space mission, ready to send humans to space | हवाईदल-इस्रोची संयुक्त अंतराळ मोहीम, अंतराळात मानव पाठविण्यासाठी तयारी सुरू

हवाईदल-इस्रोची संयुक्त अंतराळ मोहीम, अंतराळात मानव पाठविण्यासाठी तयारी सुरू

ठळक मुद्देअंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत.लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) तर्फे ६७व्या वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अंतराळात मानव पाठविण्याचा पंतप्रधान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २०२२ पर्यंत अंतराळात भारतीय मानवाला पाठविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पुणे : अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी गुरुवारी दिली.

लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) तर्फे ६७व्या वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पुरी बोलत होते.

पुरी म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत अंतराळ मानवाच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत निराकरण आणि येणारी आव्हाने या संदर्भात संशोधन करण्यासाठी बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले आहे. या संदर्भात इस्रो आणि हवाई दलाच्या मेडिकल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या असून, प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात झाली.

अंतराळ क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी भारताकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. अंतराळात मानव पाठविण्याचा पंतप्रधान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २०२२ पर्यंत अंतराळात भारतीय मानवाला पाठविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

अंतराळात मानवी जीवरक्षक प्रणालीवर भर

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) लवकरच मानवी मोहीम आखली जाणार आहे. भारतीय भूमिवरून भारतीय बनावटीच्या यानाने अंतराळवीर अवकाशात पाठविला जाणार आहे. यात अंतराळात मानवी जीवरक्षक प्रणालीवर भर देण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूटआॅफ एरोस्पेस मेडिसिन या संस्थेकडे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असल्याने इस्रोकडून संस्थेची निवड केली आहे.

Web Title: Air force - ISRO joint space mission, ready to send humans to space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.