शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात लाख घरांपर्यंत वायू वाहिनी पोहोचवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “येत्या वर्षभरात शहरातल्या एक लाख घरांपर्यंत नैसर्गिक वायू वाहिनी पोहोचवणार आहे. यासाठी येणाऱ्या तांत्रिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “येत्या वर्षभरात शहरातल्या एक लाख घरांपर्यंत नैसर्गिक वायू वाहिनी पोहोचवणार आहे. यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि इतर परवान्यांमधल्या समस्या सोडवल्या जातील,” अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.

महाराष्ट्र नँचरल गँस लिमीटेड (एमएनजीएल)ला पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत बापट बुधवारी (दि. १३) बोलत होते. एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे, कार्यकारी संचालक एस. हलदार, वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के यावेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले की, एमएनजीएलच्या माध्यमातून शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यात मोठे यश आले आहे. शहरातील सार्वजनिक बस सेवेच्या सुमारे दीड हजार गाड्या तर पन्नास हजार रिक्षा आता पारंपरिक इंधनाऐवजी नैसर्गिक वायू वापरतात. भविष्यात हे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न आहे. “कोरोना काळात ‘एमएनजीएल’ने सीएसआरमधून दिलेल्या निधीमधून रिक्षाचालकांना रोख रकमेची तसेच अनेक गरजूंना आवश्यक मदत करता आली,” असेही त्यांनी सांगितले.

पांडे यांनी सांगितले की, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही आता एमएनजीएलचे काम सुरु होणार आहे. या नव्या भागातील रिक्षा चालकांना ‘गँस कीट’साठी मदत केली जाणार आहे. एका गँस कीटला तीस हजार रुपये खर्च आहे. यावरील व्याज ‘एमएनजीएल’ भरणार आहे. सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षाला प्रती किलोमीटर १ रुपये तीस पैसे खर्च येतो तर डिझेलवरील रिक्षाचा खर्च किलोमीटरला ३ रुपये वीस पैसे आहे. शिवाय यातून वायू प्रदूषणही थांबते.

चौकट

पाचशे रुपयात कनेक्शन

“एका कनेक्शनसाठी सहा हजार रुपये तर एका घरापर्यंत कनेक्शन पोहोचवण्यासाठी एमएनजीएलला पंधरा हजार रुपये खर्च येतो. या पार्श्वभूमीवर केवळ पाचशे रुपयात कनेक्शन देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मोठ्या सोसायट्यांनी एकदम नोंदणी केल्यास सवलत देण्याचाही विचार करता येईल.”

-राजेश पांडे.

चौकट

‘एमएनजीएल’ देशात चौथी

दर दिवशी १० लाख क्युबीक मीटर वायूचा पुरवठा एमएनजीएलतर्फे सध्या केला जातो. नैसर्गिक वायू क्षेत्रात देशात असणाऱ्या चाळीस कंपन्यांमध्ये एमएनजीएल चौथ्या क्रमाकांवर आहे. पुण्यात ३ लाखांपेक्षा जास्त घरगुती जोडण्या देण्यात आल्या आहेत. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेततल्या सतराशे गाड्या नैसर्गिक वायू वापरतात. शिवाय, चाकण तळेगाव औद्योगिक वसाहतीमधल्या २२० उद्योगांनाही वायू पुरवठा केला जातो.