शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कृषी पर्यटनाला चालना देणार - सुरेश गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 03:11 IST

खेड तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी पीक पद्धतीत बदल करून आधुनिकतेची जोड मिळाली तर सकारात्मक भूमिका शेतकरीच बदलू शकतो, असे मत आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केले.

राजगुरुनगर - खेड तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी पीक पद्धतीत बदल करून आधुनिकतेची जोड मिळाली तर सकारात्मक भूमिका शेतकरीच बदलू शकतो, असे मत आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केले.चांडोली (ता. खेड) येथील जिल्हा फळरोपवाटिकेत कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), ग्रामस्वराज्य अभियान आयोजित किसान कल्याण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार गोरे बोलत होते.याप्रसंगी प्रांताधिकरी आयुष प्रसाद, कृषी उपविभागीय अधिकारी संगीता माने, तालुका कृषी अधिकारी अ‍ॅड. लक्ष्मण होटकर, पंचायत समिती कृषी अधिकारी मनोज कोल्हे, मंडल अधिकारी नरेंद्र वेताळ, आर. बी. बारवे, शेतकरी सेना तालुकप्रमुख एल. बी. तनपुरे, संभाजी कुडेकर, बाळासाहेब खैरे आदींसह शेतकरी आणि कृषी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोरे म्हणाले, की पीक पद्धतीत बदल करून सकारात्मक भूमिकेत शेती करणे काळाची गरज आहे. आज शेतकरी २४ तास शेतीत राबत आहे. मात्र, या बेभरवासाचा कारखाना चालवताना अनेक अडचणीवर मात करून आपली उपजीविका चालवताना कर्जबाजारी होत असल्याने नकारात्मक भुमिका तयार होत आहे. या शेतीला जोड व्यवसायाशिवाय पर्याय नाही. तालुक्याची भौगोलिक रचना पहाता पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिचंन होऊनही बाजारपेठेत शेतीमालाला हमी भाव मिळत नाही तोपर्यंत बळीराजाचे जीवनमान उंचवणार नाही.यावेळी तालुक्यातील शेती क्षेत्रात विविध तंत्रज्ञान वापरुन आधुनिक पद्धतीने शेती पिके घेणाऱ्या आदर्श शेतकरी चितांमण हांडे (धामणगाव खुर्द), दत्तात्रय मोरमारे (टोकावडे), भगवंता शिंदे (रोहकल), बाबूराव पिचड (आंबोली), बाळासाहेब पानसरे (निघोजे), सीताबाई जाधव ( चिबंळी), भाऊ केदारी (दोंदे), कैलासराव ठाकुर (पिपंरी), कैलास डावरे (पिपंरी), दिलीप नाईकडे (कमान), मारुती गडदे (पाईट), रामदास लांडगे, सतीश जैद (बुरसेवाडी) आणि सह्याद्री स्कूलच्या समन्वयक दीपा मोरे यांचा सत्कार करण्यात आला.या एकदिवशीय कार्यशाळेतील तालुक्यातील उपस्थित शेतकºयांना शैलेंद्र घाडगे, डॉ. सलिम शेख, श्री कुºहाडे पाटील, धनेश पडवळ, दीपा मोरे यांनी शेतीविषयक विषयावर मार्गदर्शन केले. अनेक शेतकºयांनीदेखील त्यांच्या हलाखीचे वर्णन सांगून लोकप्रतिनिधी व कृषी अधिकारी यांच्याकडून असलेल्या अपेक्षा बेधडकपणे मांडल्या.सूत्रसंचालन मंडल अधिकारी वसंतराव खंडागळे यांनी तर आभार डी. एन. गायकवाड यांनी मानले.सामूहिक शेती पद्धतीची आज काळाची गरज आहे. शेती पिके थेट बाजारपेठेत विक्री करण्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन व्यवस्थापन करून शेती फायदेशीर असूनही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे.- आयुष प्रसाद, प्रांताधिकारी

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या