शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोसाठी परदेशी वित्तीय संस्थांसोबत तब्बल १ हजार ३५० कोटी रूपयांचा करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 18:40 IST

पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार आणि सहकार्य मंत्री फ्रान्सिस्को आंद्रे आणि इआयबी चे अध्यक्ष वेर्नेर होयेर यांच्या उपस्थितीत हा करार झाला.

पुणे: शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय व युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (इआयबी) यांच्यात १५० दक्षलक्ष युरोंच्या ( १३५० कोटी रूपये) वित्तीय करारावर शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या.

पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार आणि सहकार्य मंत्री फ्रान्सिस्को आंद्रे आणि इआयबी चे अध्यक्ष वेर्नेर होयेर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव, के. राजारामन यांनी भारत सरकारच्या वतीने या करारावर स्वाक्षरी केली. तर इआयबी चे उपाध्यक्ष क्रिस्तियन केटल थॉमसन यांनी इआयबी च्या वतीने स्वाक्षरी केली.

इआयबी ने पुणेमेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी एकूण ६०० दक्षलक्ष युरोंचे कर्ज मंजूर केले आहे. पहिल्या टप्प्यासाठी २०० दशलक्ष युरोंचा वित्तीय करार २२ जुलै २०१९ रोजी करण्यात आला होता. त्यातून झालेल्या कामाचा आढावा घेऊन वित्तीय कंपनीने कर्जाचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे. 

या दुसऱ्या टप्प्यातील कर्जातून आता मेट्रोसाठीच्या कोचची (डबे) खरेदी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे महामंडळ लिमिटेड (महामेट्रो) या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी असे दोन मार्ग यात आहेत. एकूण अंतर ३१ किलोमीटरचे असून त्यामधील शिवाजीनगर ते स्वारगेट हे ५ किलोमीटरचे अंतर भुयारी आहे. संपुर्ण प्रकल्प ११ हजार ५०० कोटी रूपयांचा आहे. इआयबी शिवाय अन्य काही परदेशी वित्तीय कंपन्यांकडूनही पुणे मेट्रो प्रकल्पासाठी कर्ज घेण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोCentral Governmentकेंद्र सरकारPortugalपोर्तुगाल