शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावता आंदोलन करणे पडले महागात; ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 11:28 IST

कचऱ्याचे कंटेनर गणेश विसर्जनासाठी दिल्यामुळे भावना दुखाविल्याचे कारण देत आंदोलन

ठळक मुद्देशिवाजीनगर पोलिसांनी केला त्यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल

पुणे : गणेश विसर्जनासाठी कचर्‍याचे कंटेनर पाठवून हिंदु धर्मातील गणेश भक्तांच्या भावना दुखाविल्याच्या कारणावरुन मास्क न लावता आंदोलन करणे ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांना चांगलेच महागात पडले. फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याने त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आनंद कन्हैयालाल दवे (वय ४७, रा. गुरुवार पेठ), निलेश श्रीकांत जोशी (वय ३९, रा. आनंदनगर, वडगाव), मनोज सदाशिव तारे (वय ४४, रा. कळस), तुषार नंदकुमार निंबर्गी (वय २८, रा. शिवणे), सौरभ मनोहर वैद्य (वय २६, रा. मांजरी), दिलीप सुरेश तांबेकर (वय ५२, रा़ कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.महापालिकेने नवीन कंटेनरमध्ये गणेश विसर्जनाची सोय केली आहे. मात्र, हे कचर्‍याचे कंटेनर असून त्यामुळे आमच्या भावना दुखाविल्याचा दावा करत ब्राह्मण महासंघाच्या या पदाधिकार्‍यांनी सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन केले. त्यात त्यांनी महापालिकेचे प्लॅस्टिकचे फोटो असलेला फलक पाण्याच्या बादलीत बुडविला. पुणे महानगर पालिका निषेध असो अशा घोषणा दिल्या.हे आंदोलन करताना त्यांनी पूर्व परवानगी घेतली नाही. सह पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग करुन तोंडाला मास्क न लावता कोवीड १९ साथ रोगाचा संसर्ग होईल, असे घातकी कृत्य करुन आंदोलन केले. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला. त्या सर्वांना पोलिसांनी फरासखाना येथे घेऊन गेले. त्यानंतर त्यांची नोंद करुन घेऊन सर्वांची जामिनावर सुटका केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसGanesh Mahotsavगणेशोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाbrahman mahasanghब्राह्मण महासंघ