शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रंगकर्मींवर उपासमारीची वेळ; राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 14:05 IST

जनसामान्यांना मनोरंजनातून निखळ आनंद देणाऱ्या या कलाकारांकडे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

ठळक मुद्देगेल्या दीड वर्षांपासून विविध क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन एकाच वेळीस होणार

पुणे : कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून विविध क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जनसामान्यांना मनोरंजनातून निखळ आनंद देणाऱ्या या कलाकारांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांना जागे करण्यासाठी रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र यांनी सोमवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता आंदोलन करणार आहेत. 

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन एकाच वेळीस होणार असल्याचे संस्थेच्या वृंदा साठे यांनी सांगितले आहे. कलाकारांच्या सर्व मागण्या सरकार समोर ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत. असेही त्या म्हणाल्या आहेत. 

सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकारांबरोबरच तमाशा, भजन, कीर्तन, गोंधळ, पोवाडा, लावणी, लोककला सादर करणाऱ्या रंगकर्मींचाही या आंदोलनात सहभाग असणार आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या मागण्या या आंदोलनातून सरकारपुढे मांडण्यात येणार आहेत. 

आंदोलनातील त्वरित मागण्या 

- एक, दोन किंवा अतिशय कमी कलाकारांना घेऊन जे लोक कलावंत आपली कला दाखवून गुजराण करतात. त्यांना आपली कला सर्वत्र सादर करण्याची व त्यासाठी प्रवासाची परवानगी मिळावी. - चित्रीकरण, थिएटर व सांस्कृतिक कार्यक्रम त्वरित पूर्ववत सुरु करावेत. - शासनाने कलाकारांच्या मुलांना शाळेत विना फी प्रवेश द्यावा - महाराष्ट्रातील कलाकारांना रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी- कोरोना काळात परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत शासनाने प्रत्येक कलाकारास दरमहा ५ हजार रुपये द्यावेत - मराठी चित्रपटांना त्वरित अनुदान मिळावे   

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे