शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘अग्नीपथ’ साठी बनावट डोमिसाईल काढून देणार्‍या एजंटांना अटक

By विवेक भुसे | Updated: October 3, 2022 11:10 IST

मुंबई परिसरात राहत असल्याचे ४० बनावट डोमिसाईल काढून देणार्‍या दोघांना अटक

पुणे : केंद्र सरकारच्या सरंक्षण विभागाच्या अग्नीपथ योजनेत सैन्य भरतीसाठी मुंबई परिसरात राहत असल्याचे बनावट डोमिसाईल काढून देणार्‍या दोघा एजंटांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पोपट विठ्ठल आलंदार (वय ३८) आणि सुरेश पितांबर खरात (वय ३१, दोघेही रा. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट रबरी शिक्के, कोरे शाळा सोडल्याचे दाखले, डोमिसाईल प्रमाणपत्र, रोख रक्कम, इतर दस्त, मोबाईल, कार असा ४ लाख ५५ हजार ७०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

याबाबत सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांनी सांगितले की, मुंबई पुणे बंगलोर महामार्गात वडगाव येथील दांगट पाटील एम्पायर समोर दोघे जण येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मिळालेले बनावट रबरी शिक्के, कोरे शाळा सोडल्याचे दाखले यांची पोलिसांनी चौकशी केली. केंद्र शासनाच्या आर्मी भरतीसाठी सध्या मुंबईत अग्नीपथ भरती सुरु आहे. त्यात जी डी (जनरल ड्युटी) आणि टेक्नीकल अशा दोन पदांसाठी भरती होत आहे़ त्यात फक्त मुंबई, ठाणे, पालघर येथील रहिवासी अर्ज करु शकतात. त्यांची जाहिरात आल्यानंतर काही उमेदवारांनी अ‍ॅकेडमीकडे संपर्क साधला. त्यांनी या एजंटांमार्फत या उमेदवारांच्या बनावट शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी पुरावा तयार करण्यासाठी बनावट भाडे करार तयार केले. सरपंचाचा दाखला घेऊन सेतू मार्फत या जिल्ह्यांमध्ये रहात असल्याचे डोमिसाईल सटिर्फिकेट तयार करुन घेतले. अशा ३० ते ४० परिक्षार्थीचे डोमिसाईल या एजंटांनी तयार करुन घेतल्याचे आता पर्यंतच्या तपासात समोर आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक