शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहांच्या दुरवस्थेनंतर आता शहरातील शासकीय कार्यालयांमध्येही अस्वच्छतेचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:32 IST

- शहरात साथीच्या आजारांना सरकारी कार्यालयांतील अस्वच्छता घालतेय खतपाणी

- संदीप पिंगळे  पुणे : शहरातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाणारी शासकीय मध्यवर्ती इमारत, विधान भवनासमोरील नवी प्रशासकीय इमारत तसेच राष्ट्रीय हरित प्राधिकरण परिसरात साचलेला कचरा व दुर्गंधींमुळे कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऐन पावसाळ्यातच शासकीय कार्यालय परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचल्याने शहरात रोगराई पसरविण्यास सरकारी कार्यालयेच हातभार लावत असल्याचे चित्र आहे.एकीकडे आरोग्य विभाग पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारखे साथरोग पसरू नयेत, यासाठी घरात व परिसरात अडगळीच्या वस्तू न ठेवण्याच्या सूचना देतात. मात्र त्यास सरकारी कार्यालयेच हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. नागरिकांसह याठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.शासकीय कार्यालयांतील स्वच्छतेसाठी वर्षाकाठी लाखो रुपयांच्या निविदा काढून ठेकेदारांना दिल्या जातात. ठेकेदार स्वच्छता कर्मचारी नेमतात. परंतु ठेकेदाराकडून ठेका घेताना कागदावर दर्शविलेले कर्मचारी आणि प्रत्यक्षात कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या यात जमीन आसमानाचा फरक दिसून येत आहे. या कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे यांसारखी कोणतीही सुरक्षा साधने न पुरविता कामे करवून घेतली जात असल्याची खंत या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.मध्यवर्ती इमारत परिसरात कचऱ्याचे ढिगारेशासकीय मध्यवर्ती इमारत आवारातील जिल्हा माहिती कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस अनेक दिवसांपासून निकामी झालेल्या रिकाम्या पाण्याच्या टाक्या ठेवल्या असून त्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.मध्यवर्ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील आरोग्य सहसंचालकांच्याकार्यालयाशेजारी स्वच्छतागृहाबाहेर कंटेनरच्या बाहेर कचरा फेकलेला दिसत आहे.मध्यवर्ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कृषी सहसंचालकांच्या कार्यालयाशेजारील स्वच्छतागृहाबाहेरील कचऱ्याने ओसंडून वाहणारे कंटेनर आहेत.राष्ट्रीय हरित प्राधिकरण इमारतीमध्ये दुर्गंधी-विधान भवनसमोरील राष्ट्रीय हरित प्राधिकरण इमारतीशेजारील जागेतील कचऱ्याचे ढिगारे.-राष्ट्रीय हरित प्राधिकरण इमारतीच्या मागील बाजूला पुणे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या लिफ्टकडे जाणाऱ्या मार्गाशेजारी पडून असलेला राडारोडा.टेरेस, बाल्कनी जुन्या पडीक साहित्याने गच्चमध्यवर्ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेस, बाल्कनीत ठेवण्यात आलेल्या मोडक्या खुर्च्छा. साठलेली रद्दी यामुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून सध्याच्या पावसामुळे सर्वत्र कुबट वास येत आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड