शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

शेषराव वानखेडे यांच्यानंतर अजित पवारांनी मिळविला सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:38 IST

वार यांनी अलीकडील  काळात २०११..१२ पासून हा मान मिळविला आहे.त्यामुळे आजचा दिवस बारामतीकरांसाठी वैशिष्ठ्यपुर्ण ठरला आहे.

बारामती  -  बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री खात्याचा कार्यभार संभाळणार्या अजित पवार यांनी आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान मिळविला आहे.बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांनी १३ वेळा  अर्थसंकल्प सादर केला आहे.तर सोमवारी(दि १०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कारकीर्दीतील   अकरावा अर्थसंकल्प सादर केला.बॅरीस्टर वानखेडे यांनी महाराष्ट्राच्या सुरवातीच्या काळात १९६० च्या दशकात हा मान मिळविला.तर पवार यांनी अलीकडील  काळात २०११..१२ पासून हा मान मिळविला आहे.त्यामुळे  आजचा दिवस बारामतीकरांसाठी वैशिष्ठ्यपुर्ण ठरला आहे.बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांनी अर्थमंत्री म्हणून १३ वेळा अर्थसंकल्प मांडले आहेत. ११ जुलै १९६० ला वानखेडे यांनी सुरवातीचा अर्थसंकल्प मांडला. १९६०...६१,१९६१..६२,१९६४...६५,१९६५..६६, तसेच १९६६..६७ ,त्यानंतर १९६७...६८ मध्ये २३ मार्च आणि १५ जुन रोजी दोन वेळा वानखेडे यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर १९६८..६९,१९६९...७० मध्ये १९ मार्च आणि १७ जुन रोजी दोन वेळा,१९७०...७१,१९७१...७२ मध्ये वानखेडे यांनी शेवटचा अर्थसंकल्प सादर केला.तर उपमुख्यमंत्री पवार यांनी सुरवातीला २०११..१२,२०१२..१३,२०१४...१४ मध्ये २५ फेब्रुवारी आणि ५ जुन रोजी दोन वेळा,२०२०...२१,२०२१...२२,२०२२...२३,२०२४...२५ मध्ये २७ फेब्रुवारी आणि २८ जुन रोजी,तर २०२४..२५, तसेच नुकताच पवार यांनी २०२५...२६ चा ११ वा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील यांना मिळाला आहे. त्यांनी आतापर्यंत १९ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे.तर सुशीलकुमार शिंदे यांनी तब्बल ९ वेळा,१९७० च्या दशकात मधुकरराव चाैधरी यांनी ५ वेळा, यशवंतराव मोहिते यांनी चार वेळा,१९८० च्या दशकात शंकरराव चव्हाण यांनी एकदा,रामराव आदीक यांनी ७ वेळा,डाॅ.व्ही सुब्रमण्यम यांनी एकदा,१९९० च्या दशकात हशु अडवाणी,गोपीनाथ मुंडे यांनी एकदा,तर एकनाथराव खडसे यांनी ३ वेळा,महादेवराव शिवणकर यांनी २ वेळा,तसेच दिलीप वळसे पाटील यांनी २००९...१० मध्ये दोन वेळा, त्यानंतर २०१०...११ ला सुनील तटकरे, तसेच २०१५...१६ नंतर सुधीर मुनगटीवार यांनी ६ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.दरम्यान,उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे महायुती सरकारमध्ये  अर्थमंत्री खात्याचा कार्यभार आहे.तसेच पवार यांचा या सरकारमधील पहिलाच अर्थसंकल्प आहे.आणखी चारवेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी पवार यांना मिळणार असल्याचे उघड आहे.त्यामुळे १५ वेळा अर्थसंकल्प सादर करुन सर्वांचेच   रेकॉर्ड मोडण्याची संधी अजित पवारांकडे आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBudgetअर्थसंकल्प 2024Ajit Pawarअजित पवार