भोरला माघारीनंतर स्पष्ट होईल चित्र
By Admin | Updated: February 7, 2017 02:47 IST2017-02-07T02:47:47+5:302017-02-07T02:47:47+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समितीच्या ६ जागांसाठी ४४, तर जिल्हा परिषदेच्या ३ जागांसाठी ३१

भोरला माघारीनंतर स्पष्ट होईल चित्र
भोर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समितीच्या ६ जागांसाठी ४४, तर जिल्हा परिषदेच्या ३ जागांसाठी ३१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन तासांत बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडून अनेकांनी पक्षांतर करून उमेदवारी
मिळवली आहे. यामुळे माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
भोर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३ जागा असून, वेळू-भोंगवली गटातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांच्या पत्नी शलाका कुलदीप कोंडे (शिवसेना), सुनंदा सुके (काँग्रेस) सुनीता बाठे (राष्ट्रवादी), अश्विनी परदेशी (अपक्ष), शिल्पा संतोष बाठे (अपक्ष).
नसरापूर-भोलावडे गटातून पै. विठ्ठल आवाळे (काँग्रेस), कुणाल साळुंके (राष्ट्रवादी), विश्वास ननावरे (भाजपा) गणेश खुटवड, लहू शेलार, चंद्रकांत बाठे, काळुराम जाधव, सूर्यकांत माने (अपक्ष). उत्रौली-कारी गटातून आनंद आंबवले (काँग्रेस), रणजित शिवतरे (राष्ट्रवादी), रोहिदास जेधे (शिवसेना), सुरेश वाडकर (भाजपा), रवींद्र कोंढाळकर, राहुल धावले, मारुती धोंडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.
पंचायत समिती वेळू गणातून विद्यमान पंचायत समिती सदस्य आणि माजी उपसभापती अमोल पांगारे यांच्या पत्नी पूनम पांगारे (शिवसेना), रोहिणी बागल (राष्ट्रवादी), विजया कोंडे (भाजपा), रेश्मा पांगारे (काँग्रेस), रुक्मिनी पवार, सविता डिंबळे (अपक्ष ). भोंगवली गण - मनोज निगडे (राष्ट्रवादी), रोहण बाठे (काँग्रेस), विकास चव्हाण (शिवसेना), गणेश निगडे (भाजपा), सिद्धार्थ टापरे.
आत्माराम बोबडे, संदीप कदम (अपक्ष), नसरापूर गण: संतोष भिलारे (शिवसेना), लहू शेलार (राष्ट्रवादी), संतोष सोंडकर (काँग्रेस), किशोर धुमाळ (भाजपा), राहुल दादासो (रिपाइं), संतोष धावले,
भोलावडे गण: मंगल बोडके (राष्ट्रवादी),भारती वरखडे (काँग्रेस), द्रोपदा खुटवड (शिवसेना), मनीषा सणस (अपक्ष).
कारी गण : रु क्मिणी घोलप (काँग्रेस), ज्योती बरड (शिवसेना), दमयंती जाधव (राष्ट्रवादी), उत्रौली गण: अनिल सावले (काँग्रेस), श्रीधर किंद्रे (राष्ट्रवादी), अमर बुदगुडे (भाजपा), शिवाजी बांदल, सोनबा वरे अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.