शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

निवृत्तीनंतर 'त्यांनी' उभे केले स्वखर्चातून 'कलामंडल'; छंदांचे संग्रहालयात रुपांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 12:05 PM

अवलिया व स्वच्छंदी माणसांना निवृत्तीनंतर काय करावे हा प्रश्नच पडत नाही.. !

ठळक मुद्देवैयक्तिक असले तरी हे संग्रहालय सर्वांसाठी खुले ठेवणार

राजू इनामदारपुणे: महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर अभियंता शाम ढवळे यांनी आपल्या छंदाला स्वखर्चातून संग्रहालयाचे रूप दिले आहे. अनेक वर्षे ठिकठिकाणी भ्रमंती करून मिळवलेला खजिना 'कलामंडल' या संग्रहालयात प्रदर्शनीय झाला आहे.पौड गावाच्या अलिकडे दरवडे नावाचे गाव आहे. तिथल्या मिस्टिप वसाहतीच्या थोडे पुढे हे दुमजली कलामंडल उभे राहिले आहे. जमीन ढवळे यांच्याच मालकीची, सेवेत असताना केलेली बचत, निवृत्त होताना मिळालेले काही वेतन खर्च करून ढवळे यांनी ही स्वप्नपुर्ती केली आहे. ५ गुंठे जागेवर बांधकाम केले आहे. तिथे पुण्यातल्या जुन्या वाड्यांमधील लाकडी कोरीव कामांच्या खिडक्यांपासून ते कसबा पेठेतील पेशवाईतल्या घरांच्या जोत्याच्या दगडांसह अनेकविध वस्तू मांडून ठेवल्या आहेत. त्यातल्या बहुतेक ढवळे यांनी स्वतः फिरून जमवलेल्या आहेत, तर काही त्यांना भेट म्हणून मिळालेल्या आहेत.महापालिकेच्या बांधकाम विभागात काम करत असले तरी ढवळे मनाने पुराणवास्तू आणि इतिहासकालिन वस्तूंमध्येच रमलेले असायचे. ते स्वतः उत्तम चित्रकार, शिल्पकार आहेत.

त्यामुळे नजर जाणकार आहे. सेवेत असतानाच त्यांनी दीर्घ रजा घेऊन डेक्कन कॉलेजमधून आर्किओलॉजी आणि टिळक विद्यापीठातून हेरिटेज मॅनेजमेंट हे दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केले. सुदैवाने त्यांना पालिकेच्या हेरिटेज सेलचे प्रमुखपद मिळाले. त्यातूनच त्यांनी मग नानावाडा, विश्रामबाग वाडा, लाल महाल यांना त्यांचे जुने वैभव मिळवून दिले. महात्मा फुले मंडईची आठ पाकळ्यांची वास्तू ही त्यांंनी मजबूत केली. सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिराचाही जिर्णोद्धार केला.ही कामे करत असतानाच त्यांनी जुन्या वस्तू जमा करण्याचा आपला छंद जोपासला होताच. लाकडी कोरीव कामाचे असंख्य नमुने यात आहेत. आळंदी रस्त्यावर सापडलेले दगडी रांजण आहेत. जुन्या खिडक्या, दरवाजे, टेबल आहेत. फोन, रेडिओ याचाही यात समावेश आहे. राहत्या घरात या वस्तू ठेवणे अवघड होऊ लागल्याने त्यांनी हे कलामंडल उभे केले आहे.
 कोरोनाच्या आधीपासून ते याची उभारणी करत होते. आताच्या वस्तूंबरोबरच भविष्यात हा संग्रह वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आताच त्यांंनी दोन मजली इमारत बांधली आहे. स्वतः चित्रकार असल्याने मांडणी, सजावट त्यांचीच आहे. खिडक्या, दरवाजे त्यांनी अशा खुबीने बसवलेत की ते इमारतीचाच भाग वाटावेत. वस्तूंसाठी लागणाऱ्या बैठकाही त्यांनी स्वतः तयार केल्यात. भिंतींवर त्यांंनीच काढलेली आकर्षक चित्र आहेत. तुळशी वृंदावनापासूनच्या अनेकविध वस्तू संग्रहालयात आल्या आहेत. 
ढवळे म्हणाले, "वैयक्तिक असले तरी हे संग्रहालय सर्वांसाठी खुले ठेवणार आहे. मी जमा केलेल्या वस्तू असे नाही तर अन्य कोणालाही त्यांच्याकडे असलेल्या जून्या वस्तू इथे द्यायच्या असतील तर तशी मोकळीक आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख तिथे करण्यात येईल. थोडी कामे अद्याप बाकी आहेत. कोरोना टाळेबंदीमुळे ती करता आली नाहीत. लवकरच ती पूर्ण होतील व संग्रहालय सर्वांंना पाहता येईल."

टॅग्स :Puneपुणेartकला