एका वर्षानंतर जिल्ह्यात तमाशा फड रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:07+5:302021-02-05T05:01:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरासह ग्रामीण भागात तब्बल एक वर्षानंतर आता तमाशाचे फंड रंगणार आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ...

एका वर्षानंतर जिल्ह्यात तमाशा फड रंगणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरासह ग्रामीण भागात तब्बल एक वर्षानंतर आता तमाशाचे फंड रंगणार आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी नाटक, लोककला अंतर्गत तमाशा, लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाना परवानगी देण्यात येत असल्याचे लेखी आदेश काढले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.
राज्यासह जिल्ह्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे जिल्हाधिकारी यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार १३ मार्च २०२० पासून सर्व सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी घातली होती. यामुळे गेले एक वर्षे जिल्ह्यात सर्वच प्रकारचे नाटक, तमाशा व लावण्याचे कार्यक्रम बंद होते. याबाबत राज्य शासनाने मशिन बिगींन अंतर्गत हळुहळु सर्व नियम व अटी शिथिल केल्या आहेत. शासनाच्या याच मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यात नाटक, लोककला अंतर्गत तमाशा, लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देत असल्याची माहिती कटारे यांनी स्पष्ट केले.