शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी येथील चाळकवाडी टोलनाका झाला सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 14:49 IST

पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्यात आला असून ग्रामस्थांच्या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देमहामार्गात गेलेल्या जमिनींची नुकसानभरपाई बाधित शेतकºयांना न मिळाल्यामुळे व महामार्गाची अर्धवट असलेली कामे या संदर्भात चाळकवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन टोलनाका बंद केला होता.जो पर्यंत येथील स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही, तो पर्यंत टोलनाका सुरु न करण्याची भूमिका आमदार शरद सोनवणे व ग्रामस्थांनी घेतली होती.येत्या चार महिन्यात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद असलेला टोलनाका सुरु करण्यात आला आहे.

पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील टोलनाका ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करुन बंद केला होता. हा टोलनाका सुरु करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर ३ वेळा बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत चाळकवाडी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत या मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे पालकमंत्री गिरीष बापट यांनी टोलनाका सुरु करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गुरुवारी (दि. २८) मध्यरात्री बारा वाजल्यापासून हा टोलनाका सुरु करण्यात आला. पुणे नाशिक महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणात चाळकवाडी येथील धर्मशाळा व पिंपळवंडी बसस्टॅण्ड येथील स्मशानभूमी गेली होती. तसेच पुणे नाशिक महामार्गात गेलेल्या जमिनींची नुकसानभरपाई बाधित शेतकºयांना न मिळाल्यामुळे व महामार्गाची अर्धवट असलेली कामे या संदर्भात चाळकवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन टोलनाका बंद केला होता. जो पर्यंत येथील स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही, तो पर्यंत टोलनाका सुरु न करण्याची भूमिका आमदार शरद सोनवणे व ग्रामस्थांनी घेतली होती. या भूमिकेनंतर पालकमंत्री बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव, आयुक्त रत्नाकर गायकवाड, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी झोडगे आणि इतर अधिकाºयांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत चाळकवाडी येथील धर्मशाळा व स्मशानभूमी बांधून देण्यात येणार असल्याचे ठरले. तसेच ज्या बारा गावांमधील बाधित शेतकºयांची न्यायालयात असलेली ५३.८४ कोटी रक्कम ३ महिन्यामध्ये दिली जाईल व आळेफाटा नारायणगाव कळंब व मंचर येथील बाह्यवळणांची राहिलेली अपूर्ण कामे व बाधित शेतकºयांना नुकसानभरपाई डिसेंबर २०१७ पर्यंत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच चाळकवाडी टोलनाक्यालगत असलेल्या बाधित १३ शेतकºयांना घरांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. येत्या चार महिन्यात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद असलेला टोलनाका सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीhighwayमहामार्ग