शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

उमेदवारी नाकारल्यानंतर पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिराेळेंची 'ही' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 14:22 IST

यापुढेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करत राहील अशी प्रतिक्रीया शिराेळे यांनी दिली आहे.

पुणे : पुण्याच्या जागेवर भाजापकडून काेणाला उमेदवारी मिळणार याची जाेरदार चर्चा सुरु असताना काल रात्री उशीरा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिराेळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यापुढेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करत राहील अशी प्रतिक्रिया शिराेळे यांनी दिली आहे. 

पुण्याच्या लाेकसभेच्या जागेवर भाजपाकडून काेणाला उमेदवारी मिळाणार याची उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांना हाेती. विद्यमान खासदार अनिल शिराेळे, शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे सहयाेगी खासदार संजय काकडे आदी उमेदवारी मिळण्यासाठी उत्सुक हाेते. काल रात्री जाहीर झालेल्या यादीमध्ये पुण्याची उमेदवारी बापट यांना जाहीर करण्यात आली. आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत बापट यांचे भाजप कार्यालयात स्वागत केले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, महापाैर मुक्ता टिळक, उममहापाैर सिद्धार्थ धेंडे, आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ, खासदार जगदीश मुळीक आदी उपस्थित हाेते. शिराेळे काही वेळाने बापट यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप कार्यालयात दाखल झाले. 

शिराेळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, भारतीय जनता पक्षाने आजवर जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती प्रामाणिकपणे,पूर्ण शक्तिनिशी पार पाडण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. नेत्यांनी वेळोवेळी माझ्यावर टाकलेल्या या जबाबदा-यांसाठी मी सर्व नेत्यांचा ऋणी आहे. पक्षाने १९९२ पासून पुणे शहरातून चार वेळा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली, एकदा विरोधी पक्ष नेता म्हणूनही मला काम करता आले याचा आनंद आहे. याबरोबरच ४ वर्षे  स्थायी समिती सदस्यत्व आणि दोन वेळेला पक्षाचा शहराध्यक्ष या नात्याने पुणेकरांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी निवडून आणत पुणेकरांनीही माझ्यावर विश्वास दाखविला. या नंतरही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करीत राहीन. पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता या नात्याने जास्तीत जास्त मतांनी पुण्याची लोकसभेची जागा निवडून आणण्यासाठी मी कार्यरत असेन. 

टॅग्स :anil shiroleअनिल शिरोळेPuneपुणेBJPभाजपाgirish bapatगिरीष बापट