शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांना हकलल्याने चक्क पाळीव कुत्रा सोडला अंगावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 13:34 IST

तरुणासहित पाच जणांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देसोसायटीमधील भटक्या कुत्र्यांना हाकलत असल्याचा आरोपीला आला होता राग

पुणे: सोसायटीत शिरलेल्या भटक्या कुत्र्यांना हकलल्याने वाद होऊन त्यात तरुणाने एकाच्या अंगावर आपला पाळीव कुत्रा सोडला. त्यात कुत्रा चावल्यावर त्या व्यक्तीने हडपसर पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तपण संजय मेहता (वय २७, रा. हडपसर) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. संजय रमण मेहता व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. याप्रकरणी सुनिल महादवे नाईक (वय ५३, रा़ हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. यातील फिर्यादी व आरोपी हे दोन्ही बिनावत टाऊनशिपमध्ये रहातात.

१५ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाईक हे सोसायटीमध्ये येणार्‍या भटक्या कुत्र्यांना बाहेर हकलत होते. त्याचा संजय मेहता यांना राग आला. त्यांनी नाईक यांना शिवीगाळ करुन आपला मुलगा तपण याला बाहेरुन मुले आणण्यास सांगितले. त्याठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवला. दोघांनी मिळून नाईक व त्यांच्या पत्नीस दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच त्यांच्याकडील पाळीव कुत्र्या चावण्यासाठी नाईक यांच्या अंगावर सोडला. पाळीव कुत्रा चावल्याने नाईक हे जखमी झाले. उपचार घेतल्यानंतर नाईक यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक