शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चौकशी अहवाल तयार

By admin | Updated: June 26, 2015 04:25 IST

अंबर दिव्याची गाडी वापरून शिरवळ तालुक्यातील वडवाडीत दबंगगिरी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे

पिंपरी : अंबर दिव्याची गाडी वापरून शिरवळ तालुक्यातील वडवाडीत दबंगगिरी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्यावरील गुन्ह्यांच्या चौकशीचा अहवाल तयार झाला असून, तो लवकरच खंडाळा न्यायालयात सादर होणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे शिंदे अडचणीत येणार असल्याचे बोलले जात आहे. सातारा जिल्ह्यातील शिरवळ तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ डिसेंबर २०१४ ला वडवाडी येथे जमिनीच्या वादातून भांडणे-हाणामारीचा प्रकार घडला होता. दरोड्याबरोबरच बेकायदा जमाव जमवणे, धमकी देणे, नुकसान करणे, दंगल माजवणे असे आरोप शिंदे यांच्यावर केले होते. त्यानुसार खंडाळा पोलीस ठाण्यात शिंदे यांच्यासह मुलगा अनिकेतसह आणखी पाच अनोळखी व्यक्तींच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला होता. शिंदे हे परवानगी नसताना स्वत:च्या गाडीवर अंबर दिवा लावून महापालिका हद्दीबाहेर गेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. महापालिकेतही या प्रकरणाची आणि शिंदेंच्या दबंगगिरीची चर्चा जोरदार रंगली होती. या प्रकरणानंतर काही दिवस ते दीर्घ रजेवर गेले होते. दरम्यानच्या कालखंडात शिंदे यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. त्यानंतर न्यायालयाने खंडाळा पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. अहवाल तयार झाला असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर याबाबतचा अहवाल न्यायालयाकडे सादर केला जाणार आहे.(प्रतिनिधी)