शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

वारजे येथील अपघातानंतर पीएमपीला खडबडून जाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 7:58 PM

ठेकेदारांकडील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. पण प्रशासनाकडून दरवेळी तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून त्याकडे डोळेझाक केली जाते.

ठळक मुद्दे या अपघातानंतर प्रशासन काहीसे गंभीर असून बुधवारपासून सर्व बसेसची तपासणी करण्याचा निर्णय सुमारे ५८८ बस मार्गावर धावण्यायोग्य असून त्यापैकीही दररोज सरासरी सुमारे ४५० बस मार्गावरदर दहा दिवसांनी होणाऱ्या तपासण्या, सर्व्हिसिंग, ब्रेक, क्लच, गिअर, स्टेअरिंग, टायर या महत्वाच्या बाबींकडेही प्रामुख्याने लक्ष दिले जाणार

पुणे : वारजे येथे पीएमपी बस पुलावरुन कोसळली. या अपघातानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळ खडबडून जागे झाले आहे. ठेकेदारांकडून सर्व बसेसची कसून तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या तपासणी मोहिमेला मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली. यामध्ये एका ठेकेदाराच्या नियमितपणे मार्गावर येणाऱ्या १५ ते २० बस देखभाल-दुरूस्ती अभावी सोडण्यात आल्या नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.मुंबई-पुणे महामार्गावर वारजेला जाणाऱ्या जोड रस्त्यावर सोमवारी (दि. २ जुलै) पीएमपीची बस २० फुट खड्डयात कोसळली. या बसमध्ये असलेल्या ३२ पैकी २० प्रवासी जखमी झाले आ हेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघाताने पीएमपी प्रशासनाला जाग आणली आहे. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने सोमवारपासूनच तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली. पीएमपीने पाच ठेकेदारांकडून ६५३ बस भाडेतत्वावर घेतल्या आहेत. यापैकी ६० ते ७० बस बंदच असतात. सुमारे ५८८ बस मार्गावर धावण्यायोग्य असून त्यापैकीही दररोज सरासरी सुमारे ४५० बस मार्गावर सोडल्या जातात. या बसेसमध्येही ब्रेकडाऊनचे प्रमाण अधिक आहे. तसेच छोटे-मोठे अपघातही सातत्याने होतात. सोमवारी झालेल्या अपघातामध्ये बसच्या स्टेअरिंगचा रॉड निसटल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. ठेकेदारांकडील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. पण प्रशासनाकडून दरवेळी तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून त्याकडे डोळेझाक केली जाते. या अपघातानंतर प्रशासन काहीसे गंभीर असून बुधवारपासून सर्व बसेसची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बसेसची नियमित देखभाल-दुरूस्ती केली जाते का, आरटीओ पासिंग, दर दहा दिवसांनी होणाऱ्या तपासण्या, सर्व्हिसिंग, ब्रेक, क्लच, गिअर, स्टेअरिंग, टायर या महत्वाच्या बाबींकडेही प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक आगारामध्ये स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. आगारामध्ये ठेकेदारांच्या जेवढ्या गाड्या येतील, त्या सर्व गाड्यांची संपूर्ण तपासणी करूनच मार्गावर सोडण्यात येणार आहेत. ज्या गाडीमध्ये दोष आढळेल, ती गाडी मार्गावर सोडण्यात येणार नाही. याबाबत सर्व ठेकेदार तसेच आगार प्रमुखांना सुचना देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलRto officeआरटीओ ऑफीसNayana Gundeनयना गुंडे