जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्षपदी अफसर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:08 IST2021-07-10T04:08:19+5:302021-07-10T04:08:19+5:30

पुणे जिल्हा सहकारी बँकचे अध्यक्ष रमेश थोरात व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त जाती, भटक्या जमाती, मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल ...

Afsar Khan as District Rural Working President | जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्षपदी अफसर खान

जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्षपदी अफसर खान

पुणे जिल्हा सहकारी बँकचे अध्यक्ष रमेश थोरात व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त जाती, भटक्या जमाती, मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

उत्तर भारतीय छप्परबंद समाजातील अफसर खान म्हणून ओळखले जातात. उत्तर भारतीय समाज, पुणे जिल्हा आणि तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी असून अफसर खान यांचा त्यांच्याशी चांगला संपर्क आहे. सदर निवड झाल्यानंतर अफसर खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, पुणे जिल्ह्यामध्ये सर्व तालुका दौरे करून समाज एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडण्याचे काम करणार आहे. जिल्हा तालुका बूथ कमिटीवर कार्यकर्त्यांची फळी तयार करून सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करेल.

Web Title: Afsar Khan as District Rural Working President