शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अवाजवी दंडामुळे रखडले संशोधन संस्थांचे संलग्नीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 5:42 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक नामवंत संशोधन संस्थांचे संलग्नीकरण दंडाच्या अवाजवी रक्कमेमुळे रखडले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देसंस्थांच्या संलग्नीकरणाच्या नूतनीकरणास विलंब झाल्यामुळे त्यांना प्रतिदिवस ५०० रुपये दंडसंलग्नीकरणाचे नुतनीकरण न झाल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत २३० संस्थांचाच सहभाग

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक नामवंत संशोधन संस्थांचे संलग्नीकरण दंडाच्या अवाजवी रक्कमेमुळे रखडले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संस्थांच्या संलग्नीकरणाच्या नूतनीकरणास विलंब झाल्यामुळे त्यांना प्रतिदिवस ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आयएमडी (पुणे), योग साधना (नाशिक) यांसह ५०पेक्षा जास्त नामवंत संशोधन संस्थांनी संलग्नीकरण स्विकारले होते. तिथे उच्च दर्जाचे संशोधन चालते. विद्यापीठाचा गुणात्मक दर्जा वाढण्यासाठी या संशोधनाचा चांगल्याप्रकारे उपयोग होऊ शकेल. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी ७ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये २८९ संस्थांनी सहभाग घेतला होता. परंतु, संलग्नीकरणाचे नुतनीकरण न झाल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत २३० संस्थांनाच सहभाग घेता आला. नुतनीकरणाच्या किचकट प्रक्रियेमुळे अनेक संशोधन संस्थांचे संलग्नीकरण रखडले आहे. अधिसभा सदस्य प्रा. शामकांत देशमुख यांनी याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे विचारणा केली होती. नामवंत संशोधन संस्थांच्या संलग्नीकरण नूतनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याची गरज आहे. संलग्नीकरणाच्या वेळी आकारण्यात येणाºया दंडाची रक्कम ही देखील मोठी आहे. संलग्नीकरणाच्या आॅनलाइन प्रक्रिया संशोधन संस्थांसाठी स्वतंत्र असावी. तसेच या संस्थांसाठीचा संलग्नीकरण नूतनीकरणाचा फॉर्म हा महाविद्यालयांपेक्षा वेगळा असावा. त्यामुळे संशोधन संस्थांच्या नूतनीकरणाची सोपी होण्यास व संशोधनास चालना मिळेल अशी शिफारस शामकांत देशमुख यांनी केली आहे.गुणवत्ता सुधार योजनेवर ११ कोटींचा खर्चसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून २००३-०४ पासून गुणवत्ता सुधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी मोठयाप्रमाणात निधी खर्ची पडत आहे. २०१६-१७ या वर्षात गुणवत्ता सुधार योजनेवर १० कोटी ६७ लाख १५ हजार रुपये  खर्च झाले आहेत. त्यामध्ये चर्चासत्र, कार्यशाळा व परिषदांसाठी ४ कोटी १० लाख, क्रीडा साहित्यासाठी ७० लाख ५६ हजार, प्रयोगशाळा उपकरणांसाठी ३ कोटी ३७ लाख, बांधकामासाठी २ कोटी ४९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. गुणवत्ता सुधार योजनेवर यापूर्वी २०१५-१६ या वर्षी १० कोटी ३६ लाख तर २०१४-१५ या वर्षी ८ कोटी ७९ लाख रुपये खर्च झाले आहेत.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठeducationशैक्षणिक