शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तब्बल दीड वर्षांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण; पुणे-दुबई विमानसेवा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 10:28 IST

कोरोना पूर्वी पुणे विमानतळावरून दुबई साठी दररोज चार विमानांची उड्डाणे होत. मात्र कोरोनाच्या काळात आंतर राष्ट्रीय विमानाची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती...

प्रसाद कानडे

पुणे: कोरोनाच्या काळात बंद झालेली पुण्याची आंतरराष्ट्रीय हवाई सेवा आता पुन्हा सुरु होत आहे. पुणे विमानळावरून दुबईसाठी हवाईसेवा सुरु होत आहे. स्पाईसजेटला दुबई विमानतळावर स्लॉट देखील उपलब्ध झाला आहे. पुण्याहून दररोज ७ वाजून ५० मिनीटांनी दुबईच्या दिशेने विमान झेपवणार असल्याने सुमारे दीड वर्षाच्या कालावधीनंतर पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण होणार आहे.

कोरोना पूर्वी पुणे विमानतळावरून दुबई साठी दररोज चार विमानांची उड्डाणे होत. मात्र कोरोनाच्या काळात आंतर राष्ट्रीय विमानाची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. देशांतर्गत वाहतूक सुरु झाल्या नंतर आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सुरु व्हावी अशी प्रवाशांची मागणी होती.

मात्र त्यास डीजीसीएची परवानगी मिळत नव्हती. शिवाय आंतरराष्ट्रीय नियम देखील शिथिल झाले नव्हते. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरून दुबईसाठी प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी मिळाली असून त्याचा स्लॉट देखील निश्चित झाला आहे. लवकरच याची तारीख जाहीर होणार असून प्रवाशांना तिकीट बुक करता येणार आहे.

अन्य कंपन्याचीदेखील तयारी सुरु-

पुणे- दुबई साठी विमानसेवा देणाऱ्या अन्य कंपन्या देखील विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसा प्रस्ताव त्यांनी विमानतळ प्रशासनाकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी डीजीसीएकडे पाठविला असून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर दुबईसाठी आणखी विमानांची उड्डाणे होणार आहेत. त्यामुळे तिकीट दर कमी होतील.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpune airportपुणे विमानतळLohgaonलोहगावDubaiदुबई