शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅड. प्रशांत भूषण यांना सुनावलेल्या शिक्षेचा वकील संघटनांकडून निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 18:31 IST

अ‍ॅड. प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबाबत दोषी ठरवण्यात आले...

ठळक मुद्देपुणे जिल्हा न्यायालयातील अनेक वकिलांनी एकत्र येत काळ्या फिती बांधून व्यक्त केला निषेध

पुणे : सर्वोच्च न्यायालयातील प्रख्यात व ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ आणि सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात काळ्या फिती बांधून शांततापूर्ण निषेध सभेचे आयोजन सोमवारी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवाराबाहेर करण्यात आले होते. यामध्ये लोकायतची वकील विंग समतेसाठी वकील तसेच पुणे जिल्हा न्यायालयातील विविध वकील संघटना सामील झाल्या होत्या. यामध्ये पुणे जिल्हा न्यायालयातील विविध वकील संघटना सामील झाल्या होत्या. यामध्ये अ‍ॅड. मोहन वाडेकर, अ‍ॅड. शाहीद अख्तर, अ‍ॅड. नाथा शिंगाडे, अ‍ॅड. मोनाली चं. अ., अ‍ॅड. गायत्री कांबळे, अ‍ॅड. प्रभाकर सोनवणे, अ‍ॅड. वाजीद खान, अ‍ॅड. आरिफ खान, अ‍ॅड. सुषमा नामदास, अ‍ॅड. अतुल गुंड-पाटील, अ‍ॅड. सैफान शेख आणि इतर वकील सामील झाले होते.अ‍ॅड. प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबाबत दोषी ठरवण्यात आले. याचे कारण काय तर त्यांनी केलेले दोन ट्वीटस! ज्येष्ठ विधिज्ञांनी या निर्णयाबद्दल असहमती दर्शवत म्हटले आहे की भूषण यांची विधाने अयोग्य, तर्कविसंगत असू शकतात. परंतु यातून न्यायालयाचा अवमान होत नाही.पुणे जिल्हा न्यायालयातील अनेक वकिलांनी एकत्र येत काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार अबाधित राहावे म्हणून आम्ही बोलतोय, विरोध दर्शवतोय. आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आम्ही ती घेत आहोत असे प्रतिपादन सामील झालेल्या वकिलांनी व्यक्त केले..

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलSupreme Courtसर्वोच्च न्यायालय