शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या परिसरात आरोपीवर वकिलांचाच हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 15:26 IST

वकील देवानंद ढोकणे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या अंगावर वकिलांचा जमाव धावून गेला. बुधवारी दुपारी न्यायालयाच्या परिसरात हा प्रकार घडला.

ठळक मुद्देबढे याला न्यायालयीन कोठडी, वकिलांनी दिल्या एकजुटीच्या घोषणावकिलांनी अचानक घेतलेल्या या पावित्र्यामुळे पोलिसांचीही काहीकाळ भंबेरी अ‍ॅड.ढोकणे यांनी परत न केल्याने त्याने रागाच्या भरात गोळीबार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस

पुणे : वकील देवानंद ढोकणे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या अंगावर वकिलांचा जमाव धावून गेला. बुधवारी दुपारी न्यायालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. त्यानंतर न्यायालय परिसरात वकिलांनी जोरदार घोषणाबाजी करीत वकील एकजुटीचा नारा दिला.       वकिलांनी अचानक घेतलेल्या या पावित्र्यामुळे पोलिसांचीही काहीकाळ भंबेरी उडाली होती. मात्र, त्यांनी आरोपीला सुरक्षितपणे वाहनापर्यंत नेले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीचे हक्क अबाधीत ठेऊन २ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात सविस्तर असे की, संगमब्रीज येथे सोमवारी रात्री पावणेनऊ वाजण्याचे सुमारास कारमधून भाऊ बाळासाहेब ढोकणे यांचा सोबत घरी जात असलेले अ‍ॅड.देवानंद रत्नाकर ढोकणे (वय-४२, रा.येरवडा,पुणे) यांच्यावर दोघांनी गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कुरमादास काळूराम बढे (वय-३२, रा.कलूस,ता.खेड) यास अटक केली.तर त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे. बढे हा अ‍ॅड.ढोकणे यांचा पक्षकार असून त्याने एका खटल्याकरिता दिलेले दोन लाख रुपये अ‍ॅड.ढोकणे यांनी परत न केल्याने त्याने रागाच्या भरात गोळीबार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. कुरमादास बढे हा शिरुर तालुक्यातील रहिवासी असून त्याचे वडीलोपार्जित जमिनीवरुन वडिलांच्या चुलत्यासोबत वाद सुरु होते. जमिनीचे वाद मिटत नसल्याने बढे याने न्यायालयात धाव घेत, खटला चालविण्याकरिता अ‍ॅड.ढोकणे यांना फीच्या स्वरुपात दोन लाख रुपये देण्याचे मान्य केले. मात्र,पैसे नसल्याने त्याने वकिलांच्या सांगण्यानुसर गावा कडील २० गुंठे जमीन अ‍ॅड. ढोकणे यांचा भाऊ बाळासाहेब याच्या नावावर केली. दरम्यानच्या काळात बढे आणि त्याच्या चुलत्या मधील वाद हा अ‍ॅड.ढोकणे यांच्या सल्ल्यानुसार न्यायालयाबाहेर मिटला होता. त्यामुळे बढे याने जमीन परत नावावर करुन घेतली. तर अ‍ॅड.ढोकणे दोन लाख रुपये परत देत नसल्याने बढे याने त्यांच्यावर हल्ला केला. यासंदर्भात न्यायालयातील वकील संघटनेने मंगळवारी हल्याच्या निषधार्थ आंदोलन केले होते. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने वकिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी आरोपीची ओळख परेड व्हायची असल्याने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवला. यानंतर पोलीस आरोपीसह बाहेर आल्यावर काही वकिल त्याच्या अंगावर धावून गेले. मात्र, पोलिसांनी तातडीने आरोपीला गाडीत घालून नेले.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसadvocateवकिल