शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

सामाजिक कार्याचा जोपासला आदर्श; नक्षलग्रस्त मुलांच्या डोक्यावर मायेचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 12:38 AM

चार वर्षांपासून नक्षलग्रस्तांच्या मुलांकरिता काम करण्यास आदर्श मित्रमंडळाने सुरुवात केली

पुणे :दहशतवादाचा सामना करण्यासाठी त्याला मुळापासून उखडून टाकण्याकरिता नक्षलवाद संपविला गेला पाहिजे. त्याचा कृतिशील आदर्श घेऊन चार वर्षांपासून नक्षलग्रस्तांच्या मुलांकरिता काम करण्यास आदर्श मित्रमंडळाने सुरुवात केली.चार वर्षांपूर्वी पुण्यात नक्षलवादी सापडले. या प्रश्नावर विचारांचे कृतीत परिवर्तन करण्याचे धाडस आदर्श मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष उदय जगताप यांनी दाखविले. गडचिरोली येथे गेल्यानंतर, तेथील लोकांची व्यवस्थेविषयी कमालीची अनास्था दिसून आली. याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांना आरोग्य, शिक्षण, रोजगार याविषयी सरकारकडून कुठल्याच प्रकारचे सहकार्य मिळत नाही. या नाराजीचे रूपांतर पुढे संघर्षात झाल्याने नक्षलवाद तयार होतो आहे. शाळेकरिता रोज तब्बल पाच किलोमीटरची पायपीट करणाऱ्यांकरिता शासनाकडून दखल घेतली जात नाही अशावेळी आदर्श मित्रमंडळाने ते आपले उद्दिष्ट मानून नक्षलपीडित ११० कुटुंबांतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.वर्षभर चालणाºया मंडळाच्या उपक्रमांमध्ये नक्षलग्रस्त मुलांचे पुनर्वसन, शिक्षण आणि त्यांना स्वयंपूर्ण घडविणे असा उद्देश होता. या भागात शांतता व सुव्यवस्था राहावी याकरिता परिसरातील साडेतेरा हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.याकामी गडचिरोलीतील पोलीस प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले. साडेतेरा हजार विद्यार्थ्यांपैकी सहा हजार ७८६ विद्यार्थी निवडण्यात आले. मुलांसोबत शांततेच्या विचारांच्या पुस्तकांचे वाचन करण्यात आले. त्याची नोंद गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली गेली. शांतता व अहिंसेच्या विचारांचा प्रचार व प्रसार हा त्यामागील हेतू होता. याशिवाय त्या भागातील ३३ पोलीस स्थानकांमध्ये ग्रंथालयांची सुरुवात करण्यात आली. ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. हा सगळा सामाजिक उपक्रम पाहून ५६ माओवाद्यांनी गडचिरोतील पोलीस स्थानकात आत्मसमर्पण केले.७२ वर्षे लाइटविना...एकीकडे मोठ्या आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना दुसरीकडे गडचिरोतील अनेक भाग अद्याप अंधारातच आहे. स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होऊनदेखील त्यांच्यापर्यंत लाइट पोहोचली नाही.याकामी दोष कुणाला द्यावा, मंडळाने याकामी त्याभागातील पीडितांना मदत केली. सुरुवातीला पाच शाळांमध्ये लाइटची व्यवस्था करण्यात आली. यानंतर पुढे सहाशे घरांमध्ये लाइटचे कनेक्शन देण्यात आले. नक्षल भागातील मूळ प्रश्नांशी अद्याप संघर्ष सुरूच असल्याची भावना जगताप यांनी व्यक्त केली.मंडळाचे उपक्रमगडचिरोलीतील अतिदुर्गम आदिवासी भागासाठी टू व्हिलर अ‍ॅम्ब्ल्युन्स उपलब्ध करून दिल्या.पुढील पिढी नक्षलवादाकडे जाऊ नये, याकरिता ई- लर्निंग स्कूल व ई- संस्कार वर्ग सुरू केले.गडचिरोली पोलिसांच्या साह्याने तेथील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रदर्शनच्या सहलीचे आयोजन.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPuneपुणे