शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद उपक्रम! पुण्यात २३० देहविक्रय करणाऱ्या महिलांना दाखवला मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 20:44 IST

चित्रपट संपल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व झालेला आनंद पाहण्यासारखा होता

प्रमोद गव्हाणे

वानवडी :सिनेमा हॉल म्हटलं की तरूणाईची गर्दी तर आलीच पण त्याचबरोबर विविध वयोगटातील रसिक लोकही थिअटरमध्ये जाऊन सिनेमा पाहतात. थिअटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणे हे सामान्यांसाठी अवघड बाब नाही. पण दुसरीकडे समाजातील काही घटकांना तिथे जाऊन सिनेमा पाहणे शक्य होत नाही किंवा त्याची संधी त्यांना मिळत नाही. पण पुण्यात समाजातील अशाच एका घटकाला थिअटरमध्ये सिनेमा दाखवण्यात आला आहे.

मोठ्या लक्झरी बसेस मधून देहविक्रय करणाऱ्या २३० महिला मल्टिप्लेक्समध्ये आल्या आणि त्यांनी चित्रपटाचा अनुभव घेतला. ते क्षण त्यांना आयुष्यातील एका मोठ्या सणासारख्या वाटल्याची भावना या भगिनींनी व्यक्त केल्या. कारण पहिल्यांदाच मल्टिप्लेक्स चित्रपट गृहात त्यांनी चित्रपट अनुभवला होता. 

मनजितसिंग विरदी फाऊंडेशनकडून जागतिक महिला दिन पंधरवडा महोत्सव साजरा करत असताना बुधवार पेठ मधील 'देवदासी' तसेच कष्टकरी सफाई कामगार महिलांसाठी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित केले होते. 

स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत पुढे जात आहे. परंतु समाजात असेही काही घटक आहेत ज्या ठिकाणी आजही महिला आपले अस्तित्व पणाला लावताना दिसत आहेत. हे करत असताना शहरातील आधुनिक क्षेत्राची जाण असूनही काही गोष्टी 'ती'ला अनुभवता येत नाही. कारण समाजाचा अशा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. 

समाजात तिला सन्मान मिळावा याहेतूनेच मनजितसिंग विरदी फांऊंडेशनकडून 'तिच्या' सुरक्षिततेची काळजी घेत त्यांच्या जीवनावर आधारीत असलेला गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा बंडगार्डन येथील आयनॉक्स या मल्टिप्लेक्स चित्रपट गृहात दाखवण्यात आला. चित्रपट संपल्यावर तिच्या चेहऱ्यावरील हास्य व झालेला आनंद पाहण्यासारखा होता.

टॅग्स :Puneपुणेcinemaसिनेमा