सन्मित्र संघाचे कार्यवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:10 IST2021-05-25T04:10:40+5:302021-05-25T04:10:40+5:30

पुणे : सन्मित्र संघ पुणे या नामवंत क्रीडा संस्थेच्या नियामक मंडळाचे कार्यवाह विश्वनाथ फाटक यांचे नुकतेच निधन झाले. ते ...

Administrator of Sanmitra Sangh | सन्मित्र संघाचे कार्यवाह

सन्मित्र संघाचे कार्यवाह

पुणे : सन्मित्र संघ पुणे या नामवंत क्रीडा संस्थेच्या नियामक मंडळाचे कार्यवाह विश्वनाथ फाटक यांचे नुकतेच निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे कन्या, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

संघटनेचे घटना व नियम, वार्षिक सर्वसाधारण सभा, वार्षिक अहवाल, जमाखर्च, नव्या योजना, प्रकल्प अशा विविध जबाबदाऱ्या फाटक यांनी सक्षमपणे पेलल्या. त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली असल्यामुळे संघाचे बँकेतील सर्व व्यवहार ते काटेकोरपणे पार पाडत. जर्मन व फ्रेंच घेऊन एम.ए. झालेल्या फाटक यांचा इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी संपूर्ण युरोपसह २९ देशांमध्ये पर्यटन केले होते. तसेच त्यांना विविध प्रकारच्या गणेशमूर्ती जमविण्याचा छंद होता.

सन्मित्र संघाच्या सुवर्ण, हीरक व कै. श्रीकांत टिळक महोत्सवाच्या स्मरणिकेचे संपादकत्व विश्वनाथ फाटक यांच्याकडे होते. सन्मित्र संघाच्या सन २०२३ मध्ये होणाऱ्या शताब्दीच्या स्मरणिकेची तयारी त्यांनी याआधीच सुरू केली होती. गेल्या ९८ वर्षांच्या कागदपत्रांची संपूर्ण माहिती असणारे ते एकमेव व्यक्ती होते.

Web Title: Administrator of Sanmitra Sangh