शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दौंड तालुक्यात "प्रशासकराज" सुरु ; १० ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 08:18 IST

मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुका लवकरात लवकर घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

वासुंदे : दौंड तालुक्यात एकूण ८० ग्रामपंचायती असून त्यापैकी जानेवारी २०२४ ते आजअखेर मुदत संपलेल्या देऊळगाव राजे, जिरेगाव, वासुंदे, रोटी, एकेरीवाडी, देलवडी, राहु, नाथाचीवाडी, पिलाणवाडी व टेळेवाडी अशा १० ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दौंडचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिली.ग्रामपंचायत ही पंचायतराज व्यवस्थेमधील सर्वात खालची परंतु अतिमहत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. गावात रस्ते बांधणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, जन्म-मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, शिक्षण तसेच आरोग्य या मूलभूत सुविधा गावातील नागरिकांना पुरवण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची असते.मात्र शासनाकडून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका अद्याप न झाल्याने तालुक्यातील १० गावांचा कारभार हा प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या हातात गेला आहे. प्रशासक म्हणून पंचायत समितीतील कृषी, आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागातील विस्तार अधिकारी यांची या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी गावात जाऊन पदभार स्वीकारला आहे.परंतु त्यानंतर काही गावात प्रशासक हे फिरकतच नसून ग्रामपंचायत अधिकारीच कामकाज पाहत असल्याची वस्तुस्थिती आहे. यापैकी बहुतेक प्रशासकांकडून वेळ मिळेल तेव्हा ग्रामपंचायतींकडे लक्ष दिले जात असल्याने ग्रामीण भागातील स्थानिक नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. परिणामी गावगाड्यांच्या विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुका लवकर घ्यायला हव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.विकासाला खीळबहुतेक प्रशासकांकडून वेळ मिळेल तेव्हा ग्रामपंचायतींकडे लक्ष दिले जात असल्याने ग्रामीण भागातील स्थानिक नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. गावगाड्यांच्या विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका लवकर घ्यायला हव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रgram panchayatग्राम पंचायत