शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

मुठा कालवा पुन्हा खचला, वेळीच लक्ष देण्याची गरज : आमदार मिसाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 4:47 PM

मागील वर्षी पर्वतीतील जनता वसाहत भागात घडलेल्या कालवा फुटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ यांनी मुठा उजव्या कालव्याची पाहणी केली. यावेळी कालव्याला पडलेली भगदाडे बघून त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांची चांगलीच शाळा घेतली.

ठळक मुद्देपाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना कालवा दुरुस्तीबद्दल महत्त्वाच्या सूचनामुठा कालव्याच्या बाबतीत प्रशासन अजूनही सतर्क नाही : आमदार माधुरी मिसाळ

पुणे : मागील वर्षी पर्वतीतील जनता वसाहत भागात घडलेल्या कालवा फुटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ यांनी मुठा उजव्या कालव्याची पाहणी केली. यावेळी कालव्याला पडलेली भगदाडे बघून त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांची चांगलीच शाळा घेतली.  आतापर्यंत झालेल्या कालवा दुरुस्ती कामांचा आढावा घेण्याबरोबरच कालव्याच्या कोणकोणत्या भागात त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे आणि कालवा फुटीच्या दृष्टीने धोकादायक ठिकाणे कोणती, याबद्दल माहिती घेत अधिका-यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.

पुण्यातील जनता वसाहत जवळून जाणारा मुठा उजवा कालवा सप्टेंबर २०१८ मध्ये फुटून या भागातील रहिवाशांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर मिसाळ यांनी पाटबांधारे खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार व इतर अधिका-यांसमवेत कालव्याची पाहणी केली.

हा कालवा अनेक ठिकाणी खचला असून पुन्हा दुर्घटना टाळण्यासाठी त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे अधिका-यांच्या निदर्शनास आणून द्यायचे होते, असे सांगून मिसाळ म्हणाल्या, ‘‘काही ठिकाणी कालव्याला मोठी भगदाडे पडली आहेत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माती वाहून गेली असून संरक्षक भिंतीचे कामही ढासळले आहे. त्यामुळे कालव्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या आहेत. कालव्यात मोठ्या प्रमाणावर घाण टाकलेली दिसून येत आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत निविदा काढून कालवा दोन्ही बाजूंनी स्वच्छ करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. कालव्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीसाठीचा प्रस्ताव तयार करून अधिवेशन काळात पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सादर केला जाईल आणि त्याचा निधी उपलब्ध होताच कालवा दुरुस्तीचे काम सुरू करून लवकरात लवकर मार्गी लावले जाईल.’’

टॅग्स :madhuri misalमाधुरी मिसाळmula muthaमुळा मुठाWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प