शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:16 IST

शासनाने ५० लाख गुंठा भाव दिला तरी जमिनी न देण्याचा शेतकऱ्यांचा इशारा, शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

ठळक मुद्देप्रशासनाची शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी नोटीसा देऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरवात

राजगुरूनगर: पुणे -नाशिक रेल्वेच्या मार्गिकामुळे होलेवाडी, मांजरेवाडी खरपुडी या परिसरातील शेतकरी भुमिहिन होऊन देशोधोडीला लागणार आहे. शासनाने जमिनीला ५० लाख रुपये गुंठ्याला भाव दिला तरी रेल्वे मार्गिका होऊ देणार नाही. तसेच होणाऱ्या रेल्वे मार्गाची मोजणी होऊ देणार नाही. असा इशारा शेतकऱ्यांनी दिला असून तो आंदोलनाच्या तयारीत उतरला आहे.

पुणे -नाशिक रेल्वे मार्गिकेसाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी नोटीसा देऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. स्थानिक शेतकऱ्यांची जमीन देण्याबाबत रेल्वे अधिकारी व खेड प्रशासनाची बैठक घेण्यात आली. यावेळी खेडचे प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण, रेल्वे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.  पुणे - नाशिक रेल्वे मार्ग देशातील पहिला हायस्पीड रेल्वे मार्ग असणार आहे. या मार्गावर ताशी २२० कि.मी. वेगाने रेल्वे धावणार आहे. त्यामुळे या दोन शहरातील अंतर आता केवळ दोन तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. या भागातील शेतकऱ्याचा फायदा होणार असल्याचे रेल्वे अधिकारी यांनी सांगितले.

दरम्यान रेल्वे साठी जाणाऱ्या जमिनीची मोजणी न करताच शेतकऱ्यांना थेट नोटीसा कशासाठी दिल्या, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून कवडीमोल भावाने शेतजमिनी घेण्याचा प्रशासनाचा डाव आहे. असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.  प्रांत विक्रांत चव्हाण यांनी शेतकऱ्यांची भूमिका समजून घेत प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्नाचा भडीमार होताच प्रशासनाला बैठक उरकती घ्यावी लागली. 

रेल्वे मार्गिकेची मोजणी होऊ देणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेत या भागातून रेल्वे मार्ग जाऊ देणार नाही. यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेFarmerशेतकरीGovernmentसरकार