शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्याही बदल्यांचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2015 01:00 IST

पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्याही बदल्यांचे वेध लागले आहेत

पुणे : पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्याही बदल्यांचे वेध लागले आहेत. पुण्यातील काही बदल्यांनंतर उर्वरित अधिकाऱ्यांच्या बदल्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील तीन अतिरिक्त आयुक्त आणि पाच उपायुक्तांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली अपेक्षित आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. शहाजी सोळुंके, अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) चंद्रशेखर दैठणकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) अब्दुर रहमान यांच्यासह उपायुक्त एम. बी. तांबडे, जयंत नाईकनवरे, मनोज पाटील, राजेश बनसोडे, राजेंद्र माने यांची बदली अपेक्षित आहे. तांबडे सध्या परिमंडल एक, नाईकनवरे गुन्हे शाखा, पाटील परिमंडल चार, बनसोडे सायबर शाखा आणि माने परिमंडल तीनचे उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत. नवीन बदली अधिनियमानुसार उपायुक्त आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा कार्यकाल दोन वर्षांचा करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्यामुळे एक प्रकारचा ‘गॅप’ निर्माण होणार आहे. पुणे हे एक स्वतंत्र ‘केडर’ मानले जाते. पोलीस आयुक्तालय, त्यानंतर सीआयडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे ग्रामीण अशा पुण्यातील विभागांमध्येच काही अधिकारी फिरत राहतात. पुणे सोडायला सहसा कोणी तयार नसते. त्यामुळे अनेक अधिकारी पुणे ग्रामीण, सीआयडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह एटीएसमध्ये नेमणूक होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पुण्यातील उपायुक्त दर्जाचे तीन अधिकारी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदासाठी जोरदार ‘लॉबिंग’ करीत आहेत. ग्रामीण अधीक्षक मनोज लोहिया यांची बदली होणार आहे. त्यांनीही मुंबई पोलीस दल किंवा दहशतवाद विरोधी पथकामध्ये बदली करण्याची विनंती शासनाकडे केली आहे. यासोबतच ग्रामीणचे अतिरिक्त अधीक्षक विजयकुमार मगर आणि रवींद्रसिंह परदेशी यांच्याही बदल्या अपेक्षित आहेत. त्यामुळे या रिक्त होणाऱ्या पदांवर बसण्यासाठी शहरातील काही उपायुक्त जोरदार प्रयत्न करीत आहेत. यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षकांच्या बढत्याही रखडलेल्या आहेत. त्यांचेही एसीपी प्रमोशन लवकरच निघण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)४सूत्रांच्या माहितीनुसार अधिवेशन संपल्याबरोबर पहिल्याच आठवड्यात बदल्या आणि बढत्यांची यादी बाहेर काढण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांना बदल्यांबाबत ‘प्रेस्टीज इश्यू’ न करण्याची विनंती केली आहे. ४कोणत्याही अधिकाऱ्यासाठी लॉबिंग करु नका, असेही फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितल्याची चर्चा पोलीस दलात आहे. त्यामुळे ‘क्रीम पोस्टिंग’साठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांची अडचण झाली आहे. ४मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकूणच पोलीस खात्याच्या कामगिरीबाबत असमाधानी असल्याचे चित्र आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यापासून राज्यामध्ये उद्भवलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या, नागपूर कारागृहातून पळालेले कैदी, त्यानंतर सापडत गेलेल्या मोबाईलची मालिका, पुण्यातील टोळीयुद्ध अशा अनेक घटनांमुळे पोलिसांच्या कामावरून नाराजी आहे.