शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खोर येथे पैसे टाका आणि पाणी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:08 IST

पाण्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की, ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी देऊळगावगाडा, पडवी, खोर, भांडगाव या गावांच्या यात्रा पार पडल्या गेल्या.

खोर : पैसे टाका आणि पाणी घ्या... अशी परिस्थिती आज खोर (ता. दौंड) परिसरात निर्माण झाली आहे. या वर्षी दौंड तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पाऊस झाला नसल्याने या पट्ट्यातील खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, माळवाडी, नारायण बेट ही गावे आज पाणी... पाणी करीत आहेत.

पाण्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की, ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी देऊळगावगाडा, पडवी, खोर, भांडगाव या गावांच्या यात्रा पार पडल्या गेल्या. मात्र, केवळ ४० टक्के पाण्यावर त्या पार पडल्या. यात्रांंवरती देखील पाणीटंचाईचे संकट उभे राहिले गेले. या वर्षी उन्हाळा अतिशय कडक स्वरूपात असल्याने अजून एप्रिल, मे, जून हे तीन महिने पाण्याच्या संदर्भात अतिशय कडक व तीव्र दुष्काळी जाणार असल्याने पाणी जपून वापरण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.या वर्षी पाणी नसल्याने शेतकरीवर्गाच्या शेतजमिनी पडीक ठेवण्यात आल्या आहेत. खोरचे उपसरपंच विकास चौधरी व त्यांचे बंधू बापू चौधरी यांनी खोर गावामध्ये कॉईन बॉक्स सेन्सरद्वारे पिण्याचे पाणी ग्रामस्थांंनां कमी पैशांमध्ये देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कॉईन बॉक्समध्ये पैसे टाका आणि पाणी घ्या, या उपक्रमाच्या माध्यमातून चौधरी यांनी ५0 पैशाला १ लीटर पाणी, ५ रुपयाला १0 लीटर पाणी तर १0 रुपयांना २0 लीटर पाणी या उपलब्ध कॉईन बॉक्सद्वारे मिळत आहे. खोरमधील अनेक ग्रामस्थ, नागरिक, महिलावर्ग या पद्धतीने पाणी सध्या घेत आहेत.पाणी असूनही विजेअभावी गावे तहानलेलीकवठे : कवठे गावची पाणीपुरवठा योजना घोड नदीच्या फत्तेश्वर बंधाऱ्याहून आहे. फत्तेश्वर बंधारा आता पाण्याने तुडुंब भरला आहे. मात्र, पुरेशा विजेअभावी या परिसरातील २० हजार नागरिकांना पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे. यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी एक दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.४वीजपुरवठ्याबाबत शिरूर तहसीलदारांकडे लेखी निवेदन देऊनदेखील फक्त चार तास वीज उपलब्ध होत असल्याने कवठे गावची पाण्याची तहान पूर्ण होत नसल्याने कवठे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.४फत्तेश्वर बंधाऱ्यापासून कवठे गावचे अंतर तीन किलोमीटर आहे. कवठे गावातील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी किमान ८ तास विजेची आवश्यकता असते.४आठ तास वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने पाण्याची टाकी अर्धवट भरली जाते. त्यामुळे गावाला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला शक्य होत नाही. याबाबत पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी कवठे ग्रामस्थांंसह शिरूर तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर केले होते.४तसेच वेळोवेळी तहसीलदार शिरूर यांच्याशी फोनवरून संपर्क करूनदेखील याची दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाचे याकडे त्वरित लक्ष वेधण्यासाठी कवठे ग्रामस्थांनी संपूर्ण कवठे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.४याबाबत दोन दिवसांत गावपातळीवर बैठकीचे आयोजन केले असून कवठे गावचा एकदिवसीय गाव बंदचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे