पुणे - कोविशिल्ड लसीच्या उत्पादनामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील प्रकल्पामधील एका इमारतीला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी ट्वीट करत आगीमध्ये झालेल्या नुकसानाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.आपल्या ट्विटमध्ये अदर पूनावाला म्हणाले की, सीरम इन्स्टिट्युटमधील एका इमारतीला लागलेल्या आगीनंतर तुम्ही व्यक्त केलेली चिंता आणि प्रार्थनांसाठी तुम्हा सर्वांचे आभार. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणालाही गंभीर दुखापतही झालेली नाही. मात्र सीरम इन्स्टिट्युटच्या या इमारतीचे काही मजले या आगीत नष्ट झाले आहेत.
सीरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला भीषण आग, अदर पूनावाला यांनी दिली नुकसानीबाबत महत्त्वाची माहिती
By बाळकृष्ण परब | Updated: January 21, 2021 17:00 IST
Fire At Serum Institute : कोविशिल्ड लसीच्या उत्पादनामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील प्रकल्पामधील एका इमारतीला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे.
सीरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला भीषण आग, अदर पूनावाला यांनी दिली नुकसानीबाबत महत्त्वाची माहिती
ठळक मुद्देसीरम इन्स्टिट्युटमधील एका इमारतीला लागलेल्या आगीनंतर तुम्ही व्यक्त केलेली चिंता आणि प्रार्थनांसाठी तुम्हा सर्वांचे आभारसर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीसीरम इन्स्टिट्युटच्या या इमारतीचे काही मजले या आगीत नष्ट झाले आहेत