शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
4
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
5
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
6
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
7
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
8
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
9
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
10
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
11
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
12
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
13
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
14
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
15
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
16
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
17
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
18
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
19
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
20
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

खंडणी प्रकरणी अभिनेत्रीचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 3:12 PM

विनयभंगाची तक्रार करून अभिनेत्याकडून खंडणी वसुली प्रकरण

पुणे : विनयभंगाची तक्रार करून अभिनेत्याकडून खंडणी उकळल्या प्रकरणात अभिनेत्री सारा ऊर्फ गणेश श्रवण सोनवणे (वय 32, रा. सध्या दुबई, मूळ रा. मुंबई) हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. आर. वाघमारे यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे (रा. स्वारगेट पोलिस लाइन), राम भरत जगदाळे (रा. पर्वती पायथा, सहकारनगर) आणि रोहिणी मच्छिंद्र माने (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली होती. अभिनेते सुभाष दत्तात्रेय यादव (रा. गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकपूर्व जामीन अजार्ला फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार व अ‍ॅड. अजय ताकवणे यांनी विरोध केला. हा प्रकार 28 सप्टेंबर 2018 रोजी जगदाळे याच्या सहकारनगर येथील कार्यालयात घडला. यादव व आरोपी हे एकमेकांना ओळखतात. रोहिणी व यादव यांनी    ह्यरोल नंबर 18' या चित्रपटात काम केले आहे.

यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहिणी ही तेव्हापासून आपल्याशी लग्न कर, यासाठी यादव यांच्या मागे लागली होती. वानवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेला विनयभंगाचा गुन्हा मिटविण्यासाठी जगदाळे याने यादव यांना कार्यालयात बोलावून घेतले. तेथे त्याला व त्याच्या नातेवाइकांना रोहिणी हिचे पाय धरून माफी मागण्यास लावली. त्याचे चित्रीकरण करून 15 लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी 1 लाख रुपये टेकाळे यांनी स्वीकारले. त्यानंतर उरलेली रक्कम न दिल्याने जगदाळे, टेकाळे व रोहिणी यांनी संगनमत करून सारा हिच्यामार्फत पाय धरून माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिली. सारा दुबईत वास्तव्यास असल्याने तिला अटक करता आली नव्हती. भारतात आल्यानंतर तिने येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस