शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर ब्राह्मणच ठरतात’; अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा वादात

By राजू इनामदार | Updated: February 10, 2025 16:19 IST

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सोलापूरकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी बंदोबस्त वाढविला  

पुणे : अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ‘अभ्यास करतो तो ब्राह्मण’ या वेदांमधील वचनाप्रमाणे ब्राह्मण ठरतात, असे वक्तव्य त्यांनी एका डिजिटल माध्यमावर बोलताना केल्याचे व्हायरल झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमधून सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा हा व्हिडीओ व्हायरल केला. त्यानंतर सोलापूरकर यांच्या निषेधाला सुरुवात झाली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी सोलापूरकर यांना आता ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही, असा इशारा दिला.

खरात म्हणाले, सोलापूरकर यांची मानसिक तपासणी करून घेण्याची गरज आहे. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, काहीही करून आपले ब्राह्मणत्व टिकायला हवे, या जाणिवेतून महाराष्ट्रात काहीजण त्रस्त झालेत. सोलापूरकर यांच्यापेक्षा डॉ. आंबेडकर यांचा हिंदू धर्माचा अभ्यास नक्कीच जास्त होता. तोच हिंदू धर्म त्यांनी नाकारला व हे ब्राह्मण्यत्वाने ग्रस्त झालेले काहीजण त्यांना ब्राह्मण ठरवायला निघालेत. त्यांचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे.

दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सोलापूरकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी बंदोबस्त वाढविला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील आग्र्याहून सुटका प्रकरणाबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून सोलापूरकर नुकतेच अडचणीत आले होते. माफी मागून त्यांनी त्यातून सुटका करून घेतली होती. ते प्रकरण अजूनही धुमसत असतानाच आता पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहेत. त्यांच्याबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस