शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

कलाकार तयार पण... अभिनेता प्रियदर्शन जाधव यांची पुण्यातल्या नाट्यगृहाच्या स्थितीवर फेसबुकपोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 21:14 IST

पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वच्छतागृहाच्या प्रश्नावर अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी वाचा फोडल्यानंतर आता कलाकार प्रियदर्शन जाधव याने ‘पडद्यावर’ भाष्य करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. 

पुणे : पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वच्छतागृहाच्या प्रश्नावर अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी वाचा फोडल्यानंतर आता कलाकार प्रियदर्शन जाधव याने देखील बिबवेवाडीच्या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या तिस-या घंटेनंतर सहजपणे न घडणा-या  ‘पडद्यावर’ भाष्य करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे.  या समस्येकडे तीन महिने व्यवस्थापनाच्या झालेल्या दुर्लक्षाबाबत देखील त्याने नाराजी व्यक्त केली आहे. मराठी कुटुंब खिशातले 2000 रूपये खर्च करून मराठी नाटके पाहायला येतात, मग त्यांना दर्जात्मक नाट्यगृह देणे ही आपली जबाबदारी नाही का? असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.

        गेले ३ महिने ’शांतेचं कार्ट’ या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने पुण्याच्या अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात येणे झाले. नाटकाचा पडदा तिस-या घंटे नंतर उघडला जात नाही तर तो हाताने खेचावा लागतो. दोन बॅकस्टेज वाले दोन बाजूने पडदा धरतात आणि खेचत खेचत विंगेत जातात. मध्यांतर जवळ आले की पुन्हा ते सज्ज होतात आणि पडदा पडत नाही तर खेचत आणतात आणि अंक पहिला संपतो. असे  कित्येक प्रयोग सुरू असावे, हा वास्तववादी अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.त्याच पडद्याला दीपप्रज्वलन केल्यावर काही जणं तेलकट हात पुसतात त्यामुळे कदाचित तेल लावत गेला पडदा असे वाटून कुणी तो दुरुस्त करत नसावे, अशी  मिश्किल टिप्पणीही त्याने केली आहे.

                या संदर्भात अभिनेता प्रियदर्शन जाधव ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला, आम्हाला मान्य आहे की ’शांतेचं कार्ट’ हे नाटक विनोदी ढंगाचे आहे. त्यामुळे प्रेक्षक एकदा ही गोष्ट गंमत म्हणून सोडून देतील. पण वारंवार कुणी कसे दुर्लक्ष करेल. अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हे पुण्यातील चांगले नाट्यगृह आहे. मेकअप रूम मोठ्या आहेत, प्रशस्त पार्किंग आहे. कुठलीच तक्रार नाही पण हा इतका छोटा प्रॉब्लेम व्यवस्थापनपटकन सोडवू शकत नाही याचे वाईट वाटते. डिसेंबर मध्ये याच नाट्यगृहात ‘शांतेचं कार्ट’ चा प्रयोग झाला होता. तेव्हाही हाच अनुभव आला. पुन्हा 3 फेब्रुवारीला प्रयोग झाला तेव्हाही स्थिती  ‘जैसे थे’चं असल्याचे पाहायला मिळाले. आजही प्रेक्षक मराठी नाटके आवडीने पाहायला येतात. नाटकाला यायचे झाले तर एका कुटुंबाला 2000 रूपये खर्च करावे लागतात. मग त्यांना दर्जाची नाट्यगृह देणे आपले काम नाही का? या प्रश्नातून त्याने महापालिका आणि नाट्यगृह व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.सदाशिव लायगुडे, नाट्यगृह व्यवस्थापक : अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या पडद्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाला कळविले आहे. विभागातील कर्मचारी पाहाणी करून गेले आहेत. येत्या आठ दिवसामध्ये हा प्रॉब्लेम सुटेल.  

टॅग्स :Priyadarshan Jadhavप्रियदर्शन जाधवSocial Mediaसोशल मीडिया