शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पुणे शहरात भाजप आमदारांपुढे कार्यकर्त्यांनीच उभे केले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 11:58 IST

आमदारांना मिळालेल्या या उघड आव्हानामुळे तेही चकित झाल्याची चर्चा पक्षाच्या राजकीय वतुर्ळात मुलाखतींनंतर लगेचच सुरू झाली.

ठळक मुद्देइच्छुकांच्या मुलाखती: वहिनींना तिघांची तर काळेअण्णांना तीस जणांची स्पर्धा आमदार विजय काळे यांच्या विरोधात सर्वाधिक म्हणजे ३० जणांनी दिल्या मुलाखती

पुणे: शहरातील आठही मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडूनच कडवे आव्हान असल्याचे पक्षाने घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत गुरूवारी स्पष्ट झाले. शिवाजीनगर मतदारसंघातील आमदार विजय काळे यांच्या विरोधात तर भर मुलाखतीतच काहीजणांनी बंडाचा झेंडा फडकावला तर शहराध्यक्ष असलेल्या माधुरी मिसाळ यांना महापालिकेतील पक्षाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आव्हान उभे केले आहे.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी पक्ष कार्यालयात गुरूवारी दुपारी या मुलाखती घेतल्या. आमदारांना मिळालेल्या या उघड आव्हानामुळे तेही चकित झाल्याची चर्चा पक्षाच्या राजकीय वतुर्ळात मुलाखतींनंतर लगेचच सुरू झाली. आमदार विजय काळे यांच्या विरोधात सर्वाधिक म्हणजे ३० जणांनी मुलाखती दिल्या. त्यातील तब्बल ११ जणांनी शेलार यांना आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, पण विजय काळे यांना बदला असा ठरावच दिला असल्याचे शिवाजीनगर मतदारसंघातील मुलाखती झाल्यानंतर जाहीरपणे सांगितले. नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, ज्योत्स्ना एकबोटे, निलिमा खाडे, विजय शेवाळे,या नगरसेवकांनी तसेच पक्षात नुकताच प्रवेश केलेले सुनील माने यांनीही या मतदारसंघासाठी मुलाखत दिली. त्याशिवाय उद्योजक सुधीर मांडके यांचाही मुलाखत देणाऱ्यांमध्ये समावेश आहे. या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ३१ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.खुद्द पक्षाच्या शहराध्यक्ष आमदार मिसाळ यांनाही त्यांच्या पर्वती मतदारसंघात तीन नगरसेवकांनी आव्हान उभे केले आहे. त्यात महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्याशिवाय नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, स्विकृत नगरसेवक गोपाळ चिंतल यांनीही मुलाखत दिली. मिसाळ यांच्याशिवाय एकूण ३ जणांनी या मतदारसंघात मुलाखती दिल्या व तिघेही नगरसेवक आहेत.कसबा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. तब्बल ५ वेळा इथून आमदार झालेले गिरीश बापट खासदार झाल्यामुळे हा मतदारसंघ रिक्त आहे. त्यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी त्यावर दावा केला आहे, मात्र त्या परदेशात असल्यामुळे मुलाखतीला उपस्थित नव्हत्या. महापौर मुक्ता टिळक यांनीही इथून उमेदवारी मागितली आहे. त्याशिवाय गणेश बीडकर, महेश लडकत, धीरज घाटे, हेमंत रासने या आजी नगरसेवकांसह अशोक येनपुरे, दिलीप काळोखे या माजी नगरसेवकांनी व मनिष साळुंके यांनी उमेदवारी मागितली आहे. कोथरूड मतदारसंघातील आमदार मेधा कुलकर्णी यांनाही पालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघात एकूण १२ जणांनी मुलाखती दिल्या. त्यात मोहोळ यांच्याशिवाय नगरसेवक मंजूषा खर्डेकर, त्यांचे पती संदीप खर्डेकर, सुशिल मेंगडे, अमोल बालवडकर या नगरसेवकांचा समावेश आहे.खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्याशिवाय दिलीप वेडेपाटील, प्रसन्न जगताप, राजाभाऊ लायगुडे या नगरसेवकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. एकूण १२ जणांनी या मतदारसंघात मुलाखती दिल्या.कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे हे आमदार आहेत. तिथे २२ जणांनी मुलाखती दिल्या. तिथे एकाही नगरसेवकाने उमेदवारी मागितलेली नाही, मात्र पाटबंधारे खात्यात अभियंते असलेले पांडूरंग शेलार यांचा मुलाखत देणाºयांमध्ये समावेश आहे.हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार योगेश टिळेकर यांना नगरसेवक मारूती तुपे, उमेश गायकवाड यांनी आव्हान दिले आहे. या मतदारसंघात ९ जणांनी मुलाखत दिली.वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार जगदीश मुळीक यांना संजय पवार, उषा वाजपेयी, महेंद्र गलांडे, राजेश लोकरे यांनी आव्हान दिले आहे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाAshish Shelarआशीष शेलार