अनधिकृत नळजोडधारकांवर होणार कारवाई
By Admin | Updated: June 12, 2017 01:15 IST2017-06-12T01:15:43+5:302017-06-12T01:15:43+5:30
शहरात ज्यांच्याकडे अनधिकृत नळजोड आहेत, त्यांनी अनामत रक्कम भरून १५ दिवसांत रितसर परवानगी घेऊन नळजोड घ्यावेत

अनधिकृत नळजोडधारकांवर होणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : शहरात ज्यांच्याकडे अनधिकृत नळजोड आहेत, त्यांनी अनामत रक्कम भरून १५ दिवसांत रितसर परवानगी घेऊन नळजोड घ्यावेत; अन्यथा अनधिकृत नळजोड बंद करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष उमेश देशमुख यांनी सांगितले.
भाटघर धरणातून भोर नगरपालिकेला येणारे पाणी आणि वितरण याबाबत आराखडा तयार करून पाण्याचा होणारा अपव्यय टाळून उपाययोजना करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक उपनगराध्यक्ष उमेश देशमुख यांनी आयोजित केली होती. या वेळी वरील माहिती देशमुख यांनी दिली. या वेळी मुख्याधिकारी संतोष वारुळे, पाणीपुरवठा विभागप्रमुख विठ्ठल दानवले, लेखापरीक्षक रामाने, जराड व कर्मचारी उपस्थित होते. भोर शहरात ज्यांच्याकडे अनधिकृत नळजोड आहेत, त्यांनी नळजोड घेताना अनामत रक्कम भरून रितसर परवानगीने नळजोड घ्यावेत. शहरात उभारलेल्या इमारतीत बिल्डरने व नवीन
बांधलेल्या घराच्या घरमालकांनी नगरपालिकेकडून अद्याप भोगावटा प्रमाणपत्र घेतलेले नाही, त्यांनी १५ दिवसांत प्रमाणपत्र घ्यावे. या इमारतीमधील फ्लॅटधारकांनी रितसर पैसे भरून नळजोड घ्यावेत.