'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

By नारायण बडगुजर | Updated: May 24, 2025 22:46 IST2025-05-24T22:45:17+5:302025-05-24T22:46:22+5:30

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैष्णवी हगवणे यांच्या आईवडिलांची वाकड येथे शनिवारी रात्री भेट घेऊन सांत्वन केले.

'Action will also be taken against those who support the culprits', Eknath Shinde met Vaishnavi Hagwane's parents | 'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

नारायण बडगुजर, पिंपरी 
वैष्णवी हगवणे यांच्याबाबत घडलेली ही घटना अमानवीय आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. याप्रकरणातील दोषींना कोणीही पाठिशी घालू नये. तसे केल्यास कोणीही राजकीय पदाधिकारी किंवा कोणताही मोठा अधिकारी असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वैष्णवी हगवणे यांच्या आईवडिलांची वाकड येथे शनिवारी रात्री भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वन केले. त्यावेळी ते बोलत होते. 

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'आजच्या काळात सुनेला मारहाण होणं, पैशांची मागणी करणं अत्यंत चुकीचे आहे. आताच्या काळामध्ये अशी मानसिकता चांगली नाही. सून आपल्या मुलीसारखीच आहे. लाडकी बहीण, लाडकी मुलगी अशापद्धतीने लाडकी सून देखील मानली पाहिजे. तशी मानसिकता केली पाहिजे.' 

'याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिस सखोल तपास करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही पोलिसांना आदेश दिले आहेत. अशा घटनांमध्ये कोणीही राजकारण आणता कामा नये. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा आहे. तपासात त्रुटी राहणार नाहीत', असेही ते म्हणाले. 

‘फास्ट ट्रॅक’साठी प्रयत्न : पंकजा मुंडे

‘‘वैष्णवीच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी आहे. ज्यांनी तिचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे त्यांना कडक शिक्षा होईल. ही केस ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालायला पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’’ अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. वाकड येथे शनिवारी मंत्री मुंडे यांनी कस्पटे कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन केले.

रामदास आठवले, करुणा मुंडे यांनीही केले सांत्वन

वैष्णवी हगवणे यांच्या आईवडिलांचे सांत्वन करण्यासाठी शनिवारी रामदास आठवले, करुणा शर्मा-मुंडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनीही वाकड येथे भेट दिली. कस्पटे कुटुंबियांकडून घटना जाणून घेत संवेदना व्यक्त केल्या.

Web Title: 'Action will also be taken against those who support the culprits', Eknath Shinde met Vaishnavi Hagwane's parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.