गावठी दारू अड्ड्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:08 IST2021-05-31T04:08:52+5:302021-05-31T04:08:52+5:30

बारामती : पिंपळी (ता. बारामती) येथे मॅकडॉल कंपनीच्या मागे कालव्याच्या आडोशाला सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी ...

Action on village liquor dens | गावठी दारू अड्ड्यावर कारवाई

गावठी दारू अड्ड्यावर कारवाई

बारामती : पिंपळी (ता. बारामती) येथे मॅकडॉल कंपनीच्या मागे कालव्याच्या आडोशाला सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत अलका ऊर्फ उषा शशिकांत पवार या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. २७ हजार रुपयांचे साहित्य जप्त करत नष्ट करण्यात आले.

याबाबत पोलीस कर्मचारी दशरथ इंगोले यांनी फिर्याद दिली. शुक्रवारी (दि.२८) रोजी दुपारी ४.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. अलका पवार ही महिला कालव्यालगत हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथे छापा टाकण्यात आला. यावेळी २०० लिटर मापाचे २४ हजार रुपये किमतीचे १२ बॅरल दारूने भरलेले दिसून आले. यासह दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पोलिसांनी ताब्यात घेत तो नष्ट केला. शासकीय जमिनीमध्ये खोदाई करून गावठी हातभट्टी दारू काढण्यासाठी पवार हिने भट्टी लावली होती. पोलिसांची चाहूल लागताच ती फरार झाली.

Web Title: Action on village liquor dens