आंबेगाव व येवलेवाडी येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:03+5:302021-02-05T05:18:03+5:30
पुणे : पुणे महापालिका हद्दीमधील आंबेगाव बु. व येवलेवाडी येथील विनापरवाना बांधकामांवर कारवाई करून, सुमारे २१ हजार ८०० ...

आंबेगाव व येवलेवाडी येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पुणे : पुणे महापालिका हद्दीमधील आंबेगाव बु. व येवलेवाडी येथील विनापरवाना बांधकामांवर कारवाई करून, सुमारे २१ हजार ८०० चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
महाराष्ट्र रिजनल ॲण्ड टाऊन प्लॅनिंग ॲक्ट अधिनियम १९६६ कलम ५२ (१) (अ) अन्वये नोटीस देऊन आंबेगाव बु. स.नं. ९/१ येथे सदरची कारवाई केली. याचबरोबर आंबेगाव बु. येथीलच गुरुनानी /टीयारा ग्रुप व इतर यांचे ७ हजार ५०० चौ. फूट क्षेत्र मोकळे केले.
येवलेवाडी मधील स.नं. १ राजे उमाजी नाईक चौक येथील हामजा इनामदार व इतर यांचे १२०० चौ. फूट, स.नं. ३० व ३१ पानसरेनगर येथील अंकुश बनसोडे व इतर यांचे ३०० चौ. फूट, अल्लाउद्दीन शेख व इतर यांचे १२०० चौ. फूट, बाब डेव्ह. तर्फे जमी सैफी यांचे ५६०० चौ. फूट, बाब डेव्ह. तर्फे राजेंद्र भिंताडे व जहागीरदार डेव्ह. तर्फे अमित तुपे व हनिफ खान व सय्यद यांचे ६००० चौ. फूट असे एकूण १४ हजार ३०० चौ. फूट क्षेत्र मोकळे केले, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.