वडगाव निंबाळकरमध्ये दोन गटांत हाणामारी

By Admin | Updated: April 29, 2017 03:51 IST2017-04-29T03:51:14+5:302017-04-29T03:51:14+5:30

येथे दोन गटांत किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. यामध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

Action in two groups in Wadgaon Nimbalkar | वडगाव निंबाळकरमध्ये दोन गटांत हाणामारी

वडगाव निंबाळकरमध्ये दोन गटांत हाणामारी

वडगाव निंबाळकर : येथे दोन गटांत किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. यामध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये येथील ग्रामपंचायतीचा सदस्यचा समावेश आहे.
बुधवारी (दि. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास येथील बाजारतळावर हा प्रकार घडला. सागर दिलीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल गायकवाड, ओंकार घोरपडे, विनायक गायकवाड, विश्वजित गायकवाड, कुणाल गायकवाड, राहुल गायकवाड, आकाश जाधव (सर्व रा. वडगाव निंबाळकर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
विशाल गायकवाड व घोरपडे या दोघांनी फिर्यादीचा चुलतभाऊ अक्षय सतीश जाधव याच्या मोबाईलवर संपर्क साधून ‘तू आमच्यबद्दल लहान मुलांजवळ काय बोलतो.
तुझ्यात दम असेल तर बाजारतळावर ये अशी धमकी दिली. यावरून फिर्यादी व राजेंद्र जाधव बाजारतळावर गेले असता जमावाने त्यांच्यावर दगडाने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विरुद्ध बाजूने कुणाल अनिल गायकवाडने फिर्यादी दिली आहे. त्यानुसार सतीश जाधव (ग्रामपंचायत सदस्य), अक्षय जाधव, रंजित जाधव, राजेंद्र जाधव, सागर जाधव, गणेश जाधव, रोहन जाधव (सर्व रा. वडगाव निंबाळकर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी बाजारतळावर गेले असता वरील सात जणांनी दगडाने लाथा व बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: Action in two groups in Wadgaon Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.