टमरेलबहाद्दरांवर कारवाई, २०० कुटुंबांना स्वच्छतागृहासाठी दिले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:31 PM2017-09-17T23:31:50+5:302017-09-17T23:31:53+5:30

नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व्यक्तींवर पहाटे कारवाई करीत टमरेलबहाद्दरांचे डबे जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली

Action on Tamerlahbahadder, grant to 200 families for sanitary toilets | टमरेलबहाद्दरांवर कारवाई, २०० कुटुंबांना स्वच्छतागृहासाठी दिले अनुदान

टमरेलबहाद्दरांवर कारवाई, २०० कुटुंबांना स्वच्छतागृहासाठी दिले अनुदान

Next

चाकण : शहरात नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व्यक्तींवर पहाटे कारवाई करीत टमरेलबहाद्दरांचे डबे जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १०० लोकांवर कारवाई करण्यात आली असून १२ लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे गेल्या १५ दिवसांपासून ही कारवाई करण्यात येत आहे.
चाकण शहरातील बहुतेक नागरिकांकडे घरे आहेत, मात्र स्वच्छतागृहे नाहीत, अशा उघड्यावर शौचास जाणा-या २०० कुटुंबांना स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. यातील ४३ कुटुंबांची स्वच्छतागृहे बांधून झाली आहेत. उर्वरित १२३ कुटुंबांचे स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू आहे. या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व उघड्यावर शौचास जाणा-या व्यक्तीकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. हीच व्यक्ती दुस-यांदा सापडल्यास १००० रुपये दंड आकारला जाईल. तसेच तिस-या वेळी सापडल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असे नगर परिषदेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्वच्छता अभियानांतर्गत नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, नगराध्यक्षा मंगल गोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती धीरज मुटके, गटनेते किशोर शेवकरी, विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे, तसेच सर्व नगरसेवक व नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सार्वजनिक स्थळे, मंदिरे, शाळा, रस्ते, मैदाने आदी ठिकाणी ही मोहीम हाती घेतली आहे.
>भाडेकरूंना सुविधा द्या
चाकण शहरात अनेक भाडेकरू खोल्या आहेत. अशा ठिकाणी घरमालकांनी भाडेकरूंना स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने हे भाडेकरू उघड्यावर शौचास जात आहेत. शहरातील कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने बाहेरगावांमधून बाजार समितीत किंवा भाजीपाला बाजारात माल खरेदी-विक्री करणा-या लोकांना नाईलाजास्तव उघड्यावर जावे लागत आहे. मग नागरिक दंडात्मक कारवाईच्या कात्रीत सापडत आहेत.
नगर परिषदेकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी शौचालय किंवा मुतारीची सुविधा नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोयी-सुविधा उपलब्ध करून न देताच फक्त कारवाईचा दणका देऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न नगर परिषद प्रशासन करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
१२ जणांना दंड
चाकण परिसरात गेल्या १५ दिवसांपासून नगरपरिषदेतर्फे कारवाई करण्यात येत आहेत. आतापर्यंत १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. यातील कारवाईत दुसºयांना सापडलेल्या १२ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. प्रत्येकी ५०० असा ६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई सुरू राहणार आहेत. नागरिकांनी स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

Web Title: Action on Tamerlahbahadder, grant to 200 families for sanitary toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.