शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

आॅडिटमध्ये गंभीर आक्षेप नोंदवूनही कारवाई शून्य, मुख्य लेखापरीक्षकांचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 06:51 IST

महापालिकेच्या कचरा प्रकल्पांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च व त्यांची सद्य:स्थिती याचे आॅडिट करून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी जुलै २०१५ मध्येच आयुक्तांना सादर केला.

दीपक जाधवपुणे : महापालिकेच्या कचरा प्रकल्पांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च व त्यांची सद्य:स्थिती याचे आॅडिट करून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी जुलै २०१५ मध्येच आयुक्तांना सादर केला. या अहवालात कचरा प्रकल्पांवर झालेल्या खर्चात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते; मात्र तरीही दोन वर्षे उलटली, तरी संबंधितांवर काहीच कारवाई झालेली नाही.महापालिकेकडून सातत्याने कोट्यवधी रुपये खर्च करून, नवनवे कचरा प्रकल्प उभे केले जात आहेत; मात्र काही अपवाद वगळता बहुतेक प्रकल्प सपशेल अपयशी ठरले आहेत. मुख्यसभेत नगरसेवकांनी यावर जोरदार टीका करून चौकशीची मागणी केली होती. मुख्य लेखापरीक्षकांनी या सर्व प्रकल्पांचे आॅडिट करून त्याचा अहवाल आयुक्त, तसेच मुख्यसभेपुढे १३ जुलै २०१५ रोजी सादर केला; मात्र या अहवालावर काहीच कारवाई न करता तो दडवून ठेवला गेला. त्यामुळे आतापर्यंत पुण्याच्या कचराप्रश्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीश बापट आदींनी लक्ष घालूनही हा प्रश्न सुटू शकला नाही.कचरा प्रकल्पांना बिलापोटी जादा रकमा अदा करण्यात आल्या. या प्रकल्पांकडून दंडापोटी आकारण्यात आलेल्या रकमेची वसुली करण्यात आली नाही. भुईभाडे घेतले गेले नाही, अशा कोट्यवधी रुपयांच्या रकमेची वसुली करणे बाकी असल्याचा आक्षेप या अहवालामध्ये नमूद करण्यात आला आहे. हा प्रकल्प उभारणीसाठी महापालिकेने केलेला लिचेट प्लँट बांधणी खर्च, कीटकनाशक व औषध फवारणी खर्च, अग्निशमन व्यवस्थेसाठी झालेला खर्च वसूल करण्यात आलेला नाही. प्रकल्पांमधून मिळालेल्या उत्पन्नाची आकडेवारी ठेवण्यात आलेली नाही.आॅडिटमध्ये नोंदविण्यात आलेले प्रमुख आक्षेपकचरा प्रकल्पांना बिलापोटी जादा रकमा अदा करण्यात आल्या. या प्रकल्पांकडून दंडापोटी आकारण्यातआलेल्या रकमेची वसुली करण्यात आली नाही.प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने केलेला लिचेट प्लँट बांधणी खर्च, कीटकनाशक व औषध फवारणी खर्च, अग्निशमन व्यवस्थेसाठी झालेला खर्च वसूल करण्यात आलेला नाही.या प्रकल्पांमधून मिळालेल्या उत्पन्नाची आकडेवारीठेवण्यात आलेली नाही.कचरा प्रकल्पांची बिलेअदा करताना चुकीची आकडेवारी देऊन जास्तीची बिले दिली गेली.काम वेळेत पूर्ण न केल्याप्रकरणी ठेकेदाराकडून दंड वसुली केली नाही.या प्रकल्पांमधून किती खत, बायोगॅस, वीजनिर्मिती झाली याबाबतचे रेकॉर्ड उपलब्ध नाही.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका