शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळजन्य परिस्थितीत सुरु असलेल्या वॉटरपार्कवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 12:05 IST

मावळ तालुका वगळता अन्य १२ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती आहे.

ठळक मुद्देदुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय टँकरवर २८ कोटी ९९ लाख रुपये खर्च करण्यात येणार जिल्ह्याचा  ६५ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार

पुणे : पाऊस लांबण्याचा असलेला अंदाज आणि जिल्ह्यातील धरणांनी गाठलेला तळ, या पार्श्वभूमीवर दुष्काळ घोषित करण्यात असताना सुरु असलेल्या वॉटर पार्कवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यात मावळ वगळता अन्य तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.  राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सात तालुके होते. दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच तालुक्यांमधील १९ मंडलांचा समावेश दुष्काळी भागात केला आहे. जिल्ह्यात पुणे शहरासह १४ तालुके आहेत. शहर वगळता जिल्ह्यात १३ तालुके आहेत. त्यांपैकी मावळ तालुका वगळता अन्य १२ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती आहे. जिल्ह्याचा  ६५ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला असून, त्यापैकी टँकरवर २८ कोटी ९९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबरोबरच खासगी विहिरींमधून पाणी विक्री करता येणार नसल्याचेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यातील खासगी विहिरींमधून पाण्याची विक्री होत असल्यास, संबंधित विहीर अधिग्रहित करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. धायरी भागातील एक खासगी विहीर ताब्यात घेण्यात आली असून, पुणे महानगरपालिकेकडून संबंधित ठिकाणी शासकीय दराने पाणी पुरवठा केला जात आहे.--- जिल्ह्यात मावळ तालुक्यात सर्वाधिक वॉटर पार्क आहेत. हा तालुका दुष्काळी म्हणून घोषित केलेला नाही. मावळ सोडून इतर ठिकाणी बेकायदा वॉटर पार्क सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच टंचाईग्रस्त भागातील वॉटर पार्क सुरू असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

टॅग्स :Puneपुणेwater parkवॉटर पार्कNavalkishor Ramनवलकिशोर रामdroughtदुष्काळ