शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील सांगवीत वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या; वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 12:45 IST

बारामती पोलीस पथकाची कामगिरी, साडे तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त 

ठळक मुद्देपोलिसांना शिरवली ते माळेगाव या रस्त्याने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर येणार असल्याची गुप्त माहिती मिळताच सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

बारामती (सांगवी ): फलटण तालुक्यातून बारामती तालुक्यात वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. बारामती पोलीस  पथकाने बारामती तालुक्यातील शिरवली येथे अवैध वाळूउपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळया आहेत.

या कारवाई दरम्यान वाळूसह ३ लाख ५२ हजार रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात चोरीसह सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश बापूराव मदने (रा. सांगवी, ता. फलटण,जि. सातारा ), प्रभू बसपराव म्हेत्रे (रा. सोमंथळी, ता. फलटण, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश शिवाजी कर्चे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी (दि. २२) पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

उपविभागीय पोलिस अधिकारी मयूर भुजबळ यांना शिरवली ते माळेगाव या रस्त्याने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेत सापळा रचला. यावेळी समोरून ट्रॅक्टरला दोन ट्रेलर जोडलेले येताना दिसले. या दोन्ही ट्रेलरमध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू होती. दरम्यान चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्याचे नाव विचारले असता त्याने सुरेश मदने आणि मालकाचे नाव प्रभू म्हेत्रे असल्याचे सांगितले.

वाळू कुठून आणली याची चौकशी केल्यावर फलटण तालुक्यातील  सोमंथळी येथील ओढ्यातून ही वाळू काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणच्या वाळू उपशाचा कोणताही लिलाव झालेला नाही. या कारवाईत पोलिसांनी २ लाख रुपयांचा ट्रॅक्टर दोन ट्रेलर व वाळू असा ३ लाख ५२ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकBaramatiबारामती