शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुप्यात युरियाची कृत्रीम टंचाई करणाऱ्या दुकानांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 22:50 IST

या कारवाईची माहिती समजताच काही कृषी दुकानदार आपआपली दुकाने बंद करुन निघून गेले.

सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथे युरियाची कृत्रीम टंचाई करणाऱ्या दोन दुकानांवर कृषी अधिकाऱ्यांच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. या दोन दुकानातुन सुमारे ४०३ युरिया पिशव्यांचा साठा आढळून आला. सुपे येथील काही दुकानदार युरियाची कृत्रीम टंचाई करित असल्याची तक्रार शेतकऱ्यांच्यावतीने कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी बुधवारी ( दि. १७ ) सुप्यातील कृषी दुकानावर धाडी टाकल्या. त्यात येथील मोरया कृषी सेवा केंद्र आणि महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र या दोन दुकानातुन सुमारे ४०३ युरियाच्या पिशव्यांचा साठा आढळून आला.

या कारवाईची माहिती समजताच काही कृषी दुकानदार आपआपली दुकाने बंद करुन निघून गेले. मागील एक महिन्यापासून युरियाची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी तालुका कृषी विभागाकडे केल्या होत्या. मात्र दुकानदारांवर अद्याप कारवाई होत नव्हती. युरिया उपलब्ध झाला तरी एक दोन दिवसात साठा संपला असल्याचे दुकानदार जाहीर करित होते. तर काही शेतकऱ्यांना जादा दराने युरिया देण्याचा प्रकार घडत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील दोन ते चार दिवसांपासून युरिया मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. त्यामुळे येथील शेतकरी राजकुमार लव्हे यांनी थेट तालुका कृषी अधिकाऱ्यांनाच फोन लावुन कृत्रीम टंचाई होत असल्याची तक्रार केल्याने ही धडक कारवाई झाली.        दरम्यान तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या कि, आज ( बुधवारी ) सुप्यात युरियाची कृत्रीम टंचाई करणाऱ्या दोन दुकानदारांवर कारवाई केली आहे. मोरया कृषी सेवा केंद्रात २१६ पिशव्या युरिया तर महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र यांच्याकडे १८७ मिळुन सुमारे ४०३ युरिया पिशव्यांचा अतिरिक्त साठा आढळुन आला. या दुकानदारांनी तरतुदीचे उल्लंगन आणि नियमाप्रमाणे खते वाटप न करणे या कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यानुसार येथील दुकानांचा स्थळ पंचनामा करुन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय पाचोळे यांच्याकडे अहवाल देणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल असे बांदल यांनी सांगितले. आजच त्या दुकानातील युरियाचा साठा जप्त करणार होते. मात्र शेतकऱ्यांची टंचाई होऊ नये ही खबरदारी घेऊन दुकानदाराला तातडीने युरियाची विक्री करण्यास सांगितली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरीत युरिया उपलब्ध झाला.

टॅग्स :Baramatiबारामती