वीजचोरी करणाऱ्या २५ ग्राहकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:53+5:302021-02-05T05:06:53+5:30
आव्हाळवाडी : वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यासाठी महावितरणच्या मुळशी विभागाकडून पथक स्थापन करण्यात आले आहे. वाघोलीसह परिसरातील गावांमध्ये विजेची ...

वीजचोरी करणाऱ्या २५ ग्राहकांवर कारवाई
आव्हाळवाडी : वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यासाठी महावितरणच्या मुळशी विभागाकडून पथक स्थापन करण्यात आले आहे. वाघोलीसह परिसरातील गावांमध्ये विजेची चोरी करणाऱ्या २५ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे कारवाई महावितरणाच्या नियमानुसार केली जाणार असल्याची माहिती वाघोली येथील सहायक अभियंता गणेश श्रीखंडे यांनी दिली. महावितरणाच्या मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली शाखा येथे पथक स्थापन करण्यात आले. या पथकामध्ये वरिष्ठ कार्यालयामधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुळशी विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले यांचे मार्गदर्शनाखाली पथक पथक तयार करण्यात आले आहे. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता बाबरेकर व सहायक अभियंता बाबर, सहायक अभियंता गणेश श्रीखंडे, सहायक अभियंता अंकुश मोरे व विद्युत कर्मचारी उपस्थित होते.