जिल्ह्यात वाळूमाफियांवर कारवाई
By Admin | Updated: June 29, 2014 22:55 IST2014-06-29T22:55:54+5:302014-06-29T22:55:54+5:30
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे महसूल विभागाने पोलीस यंत्रणोच्या साहाय्याने नदीपात्रत दोन वाळूच्या ट्रक चोरटी वाहतूक करताना पकडण्यात आले होते.

जिल्ह्यात वाळूमाफियांवर कारवाई
>कोरेगाव भीमा : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे महसूल विभागाने पोलीस यंत्रणोच्या साहाय्याने नदीपात्रत दोन वाळूच्या ट्रक चोरटी वाहतूक करताना पकडण्यात आले होते. विशेष म्हणजे या दोन्ही ट्रकवर एकच नंबर असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण
झाला होता.
या वाहनांवरील महसूल व पोलीस कारवाईनंतर पोलीस ठाण्याच्या आवारात नंबर बदलण्यात आले असल्याने चोरटी वाहतूक करणा:या वाहनांवरील नंबर बदलण्यामागे महसूल व पोलीस यंत्रणोचे काय धागेदोरे आहेत हे मात्र गूढ अद्याप उकलले नाही.
दि. 27 रात्री वढू बुद्रुक हद्दीत चोरटी वाळूचे उत्खनन करून वाहतूक करणा:या दोन ट्रक वाहनांवर महसूल विभागाचे स्थानिक कोतवाल, पोलीस पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने कारवाई केली. एम. एच. 12 एच. डी. 5452 या एकाच नंबरचे दोन ट्रक वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने कोतवाल व पोलीस पाटील यांनी शिक्रापूर पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या तीन पोलीस कर्मचा:यांनी सदर एकाच नंबरचे दोन ट्रक ताब्यात घेऊन शिक्रापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. (वार्ताहर)
गुन्हे दाखल होणार
नदीपात्रत यांत्रीक बोटीचे लोखंडी पाईप व बॅरल फोडले असुन वाळु माफीयांची नावे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.येथुन पुढे भरारी पथकाद्वारे धडक कारवाई मोहीम राबवुन असे अवैध धंदे समुळ नष्ट करु असे तहशीलदार रघुनाथ पोटे यांनी सांगीतले. वाळु चोरावर कायम महसुल विभाग करडी नजर ठेवेल.कोणाचीही गय केली जाणार नसुन पुन्हा असे दिसुन आल्यास अशीच कारवाई करुन गुन्हे दाखल करु असे त्यांनी सांगीतले.