बेलसर येथे वाळूमाफियांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:10 IST2021-05-17T04:10:33+5:302021-05-17T04:10:33+5:30

बेलसर गावात विनापरवाना वाळूची वाहतूक होत असल्याची बातमी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे ...

Action on sand mafia at Belsar | बेलसर येथे वाळूमाफियांवर कारवाई

बेलसर येथे वाळूमाफियांवर कारवाई

बेलसर गावात विनापरवाना वाळूची वाहतूक होत असल्याची बातमी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे धर्मवीर खांडे, राहुल माने,संजय ढमाळ यांनी पहाटे एक वाजता बेलसर येथे जाऊन विनापरवाना ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळू वाहतूक करण्यावर छापा टाकला. या वेळी पोलिसांची चाहूल लागताच दोन ट्रॅक्टरवरील चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी या वाहनातील दीड ब्रास वाळू व दोन ट्रॅक्टर असा सुमारे चार लाखांचा मला जप्त केला आहे.

सदर ट्रॅक्टर नितीन नरसिंग गरुड,व सोन्या माकर यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार नंदकुमार पिंगळे अधिक तपास करीत आहेत.

फोटो : जेजुरी पोलिसांनी बेकायदेशीर विनापरवाना वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले आहेत.

Web Title: Action on sand mafia at Belsar